पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

Sadanand Date has been appointed to the post of DGP

मुंबई  : प्रतिनिधी :  महाराष्ट्र पोलीस दलाला वर्षांच्या अखेरीस नवे पोलीस महासंचालक मिळाले असून अपेक्षेप्रमाणे या पदावर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंदाचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळत्या प्रमुख रश्मी शुक्ला शनिवारी निवृत्त झाल्याने त्यांची धुरा दाते यांच्यावर दोन वर्षासाठी सोपविण्यात आली आहे. दाते येत्या शनिवारी ( दि. ३) डीजीपीचा पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात आले.

  दाते हे १९९० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून राष्ट्रीय तपास यंत्रणेचे ( एनआयए) प्रमुख पदावरून गेल्या आठवड्यात कार्यमुक्त झाले आहेत. डीजीपी पदासाठी त्यांची ‘घरवापसी’ करण्यात आली आहे. वयोमानानुसार दाते यांची सेवानिवृती ३१ डिसेबर २०२६ पर्यत आहे. मात्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक पदावर दोन वर्षासाठी नियुक्ती केली असून त्याबाबतचे आदेश गृह विभागाकडून शनिवारी जारी करण्यात आले. (Sadanand Date has been appointed to the post of DGP)

२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी सदानंद दाते हे अपुरे कर्मचारी व शस्त्र असताना कामा रुग्णालयात प्रवेश करून अतिरेक्याना थोपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या शौर्यामुळे अनेक महिला व बालकांचा जीव वाचला होता.

  दोन वर्षांपासून डीजीपी म्हणून कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपला. त्यामुळे त्यांच्या जागी प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या दाते यांची निवड मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली आहे. (Sadanand Date has been appointed to the post of DGP)

कोण आहेत दाते?

अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दाते यांचा पोलीस दलातील गेल्या साडेतीन दशकातील प्रवास युवा अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कठोर निर्णयांसाठी ओळखले जातात. २०१५ मध्ये त्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ ) महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. त्याच वेळी छत्तीसगडसह देशाच्या अनेक भागात नक्षलवादी हिंसाचार झाला होता. त्यावेळी सशस्त्र मोहीम सुरू करण्यात आली होती.  (Sadanand Date has been appointed to the post of DGP)

 गडचिरोली इथे नक्षलवादी आघाडीवर नियुक्ती करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांना सीआरपीएफमध्ये आयजी पदावर बढती मिळाली होती. तसंच त्यांना सीआरपीएफचं स्पेशल आयजी बनवण्यात आलं होतं. यानंतर ते सीआरपीएफमध्ये डीजी म्हणून पाच वर्षे प्रतिनियुक्तीवर होते. यानंतर त्यांच्याकडे एनआयएची कमान सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.मुंबईत त्यांनी अप्पर आयुक्त म्हणून तसेच सहआयुक्त (गुन्हे ) म्हणून काम केले आहे. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कामगिरी अंत्यत लक्षवेधी ठरली होती. या कालावधीत आयुक्तालयातर्गत अवैध धंदे, पोलीस दलातील भ्रष्टाचाराला त्यांनी अंकुश लावला होता. (Sadanand Date has been appointed to the post of DGP)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर