‘मनामनातील पीडी’ आणि ‘भाषाबंध’ पुस्तकांचे प्रकाशन

Publication of the books 'Manamanatil PD' and 'Bhashabandh'

कोल्हापूरः हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड संस्थेच्या उंचगांव येथील समर्थ विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात ‘मनामनातील पीडी’ आणि ‘भाषाबंध’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 “मनामनातील पीडी” पुस्तकाचे प्रकाशन ‘पुस्तक प्रेमी’ समूहाचे संस्थापक-संचालक व बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक कृष्णा दिवटे यांच्या हस्ते तर ‘भाषाबंध’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर कवी आणि महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांच्या हस्ते झाले. (Publication of the books ‘Manamanatil PD’ and ‘Bhashabandh’)

 ‘मनामनातील पीडी’ या पुस्तकात बँकिंग, समाजकार्य तसेच सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय कार्य केलेले प्रमोद उर्फ पी. डी. देशपांडे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच हेल्पर्स परिवार सदस्यांनी घेतला आहे. या पुस्तकाचे संयोजन व संकलन रेखा मुतालिक देसाई, अंजना लगस व ऋचा करकरे यांनी केले आहे. भाषाबंध पुस्तकात पी. डी. देशपांडे यांनी हिंदी, मराठी, उर्दू व इंग्रजी साहित्यातील श्रेष्ठ ६६ कवितांचा अनुवाद केला आहे. ६६ वा वाढदिवस ६६ कवितांच्या अनुवादाचे ‘भाषाबंध’ या पुस्तकाच्या प्रकाशनाद्वारे साजरा करण्याचा पी. डी. देशपांडे यांचा उपक्रम अभिनव असून त्यातून त्यांचा चौफेर व्यासंग दिसून येतो, असे उद्गार विजय चोरमारे यांनी काढले. भाषेच्या नावाने मनामनांत निर्माण होणारी दरी कमी करण्याचा देशपांडे यांचा गेल्या सात वर्षांपासूनचा ‘भाषाबंध’ हा बहुभाषिक उपक्रम भारतीय समाजासाठी मोलाचा असल्याचे ते म्हणाले. (Publication of the books ‘Manamanatil PD’ and ‘Bhashabandh’)

संदीप मोरे यांनी पी. डी. देशपांडे यांच्याबद्दल निवडक सुहृदांनी व्यक्त केलेल्या भावनांचा व्हिडिओ सादर केला. ‘अंनिस’च्या सीमा पाटील, प्रकाशिका भाग्यश्री पाटील-कासोटे, पवन तवंदकर, मोनिका खैरमोडे आदींनी देशपांडे यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त केला. सीए शरद सामंत व सौ. सुजाता सामंत यांच्या हस्ते प्रमोद देशपांडे व डॉ. छाया ठाकूर-देशपांडे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. प्रमोद देशपांडे ‘पीडी’ यांनी आपल्या कार्याचे श्रेय त्यात सहभागी झालेल्या असंख्य चांगल्या माणसांचे असल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. (Publication of the books ‘Manamanatil PD’ and ‘Bhashabandh’)

‘सुखदुःखाचे घास दे’ ही हेल्पर्सची प्रार्थना पारस शिंदे व कल्याणी शिंदे या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी परशराम माईनकर, पवन आणि अंकिता यांच्या वाद्यांच्या साथीने सादर केली. कृष्णा दिवटे यांचे स्वागत रेखा देसाई यांनी तर विजय चोरमारे यांचे स्वागत अंजना लगस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुग्धा गोरे–लिंगनूरकर यांनी केले. सचिन घाडीगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास नीलाम्बरी कुलकर्णी, गौरी भोगले, प्रा. विनोद कांबळे, दिलीप इंगवले, मनोहर देशभ्रतार, ग्यानी बठेजा, सुजाता गारे, नंदकुमार मोरे, प्रथमेश सामानी, उदय गोखले, जयश्री गोखले, सुबोध मुंगळे, राजश्री साकळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. (Publication of the books ‘Manamanatil PD’ and ‘Bhashabandh’)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर