नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या डोळ्यात भिती दिसत आहे. त्यांनी अमेरिकेपुढे सपशेल शरणागती स्वीकारली आहे असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी घणाघात केला. भारत अमेरिका व्यापार करारावर त्यांनी आपल्या भाषणात टीका केली. भारतीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण असल्याचा आरोपही सरकारवर गांधी यांनी केला. (Fear in the Prime Minister’s eyes)
लोकसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहूल गांधी यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारने अर्थसंकल्पात डेटा सुरक्षा, खाद्यपदार्थ, उर्जा, शेतकरी यांच्याबद्दल काय केले आहे, असा सवाल केला. एकीकडे भारत सरकार स्वयंपूर्ण होण्याची चर्चा करत आहे आणि दुसरीकडे अमेरिकेचा व्यापार वाढवण्यासाठी भारताने आयातीचे धोरण मान्य केले आहे, असा आरोप गांधी यांनी केला. (Fear in the Prime Minister’s eyes)
बांगलादेशला शून्य टक्के, भारतावर १८ टक्के कर
आपल्या भाषणात राहूल गांधी यांनी अमेरिकेकडून बांगलादेशाच्या निर्यातीवर शून्य टक्के कर आकारला आहे तर भारतावर १८ टक्के कर आकारला जाणार आहे याकडे लक्ष वेधले. त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग उद्योगाला मोठा धक्का बसणार आहे. भारत अमेरिका व्यापार करारामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. मका सोयाबिन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागणार असल्याचा दावाही त्यांनी केला. (Fear in the Prime Minister’s eyes)
भारत तेल खरेदी कुठुन करणार हे अमेरिका ठरवणार
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे, सोन्या चांदीच्या किंमती वाढत आहेत याकडे लक्ष वेधताना भारत तेल कुठुन खरेदी करणार हे अमेरिका ठरवणार आहे याकडे लक्ष वेधले. सध्या जगभर एआयची चर्चा सुरू आहे. डेटा नसेल तर एआय चा काही उपयोग नाही. अमेरिकेला सुपरपॉवर व्हायचे आहे. त्यासाठी त्यांना भारताचा डेटा महत्वाचा आहे. त्यामुळे अमेरिका आपल्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एपस्टिन फाइल्सवरुन गोंधळ
राहूल गांधी यांनी एपस्टिन फाइल्सची उल्लेख करत एका केंद्रीय मंत्री आणि एका उद्योगपतीचा उल्लेख करताच सभागृहात गोंधळ उडाला. अर्थसंकल्पीय चर्चेत असे विषय आणू नये, असे पिठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी वारंवार दिली. त्यानंतर राहूल गांधींनी बजेटच्या विषयावर समारोप केला.