कोल्हापुरात प्रकाश आंबेडकर यांचा निषेध

Protest against Prakash Ambedkar in Kolhapur

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांबाबत काढलेल्या अनुद्गाराबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने त्यांचा निषेध करण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौक येथील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

दसरा चौक येथे काल बुधवारी (दि.१७) सायंकाळी वंचित आघाडी ची विजयी संकल्प सभा झाली. यामध्ये बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांवर अनावश्यक भाष्य करताना,येथे इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि वर्तमानपत्राचे पत्रकार खरव.. खरव..खरडवतात पण त्यांचे मालक बातम्या कापतात, ते विकलेले असल्याचे वक्तव्य केले. याप्रकरणी येथील जेष्ठ पत्रकारांनी फोन करुन, प्रकाश आंबेडकर यांना चांगलेच सुनावले. (Protest against Prakash Ambedkar in Kolhapur)

दरम्यान आज सकाळी कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयात निषेध सभा घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. शिव,शाहु,फुले, आंबेडकर यांच्या या पुरोगामी नगरीत कोल्हापुरची लेखणी विकाऊ नसल्याचे सांगताना,पत्रकारितेवर आघात करणा-या प्रवृत्तीला येथील पत्रकारांनी नेहमीच परावृत्त केले आहे. कोणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी येथील पत्रकारितेची नाहक बदनामी करु नये. तसेच समाजाचीही दिशाभूल करु नये, असे पत्रकारांकडून सुनावण्यात आले.यानंतर ऐतिहासिक दसरा चौक येथील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करुन, निषेध व्यक्त करण्यात आला. (Protest against Prakash Ambedkar in Kolhapur)

यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, जेष्ठ पत्रकार निवास चौगले, बंडोपंत काईंगडे, भूषण पाटील, लुमाकांत नलवडे, दिपक घाटगे, रणजीत माजगावकर, विजय केसरकर, सुनील पाटील, सतेज औंधकर, संदीप खांडेकर, संभाजी गंडमाळे, सचिन सावंत, दयानंद जिरगे, शेखर पाटील, महेश कांबळे, राहुल गडकर, युवराज राऊत, दूर्वा दळवी, श्रद्धा जोगळेकर, प्रियंका निगवे, अभिजीत पाटील, विश्वास कोरे, ओंकार धर्माधिकारी, निलेश शेवाळे, सुनील काटकर, विकास पाटील, धीरज बरगे, बाळासाहेब उबाळे, विशाल पुजारी, सुरेश आंबुसकर, यांच्यासह कोल्हापूर प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. (Protest against Prakash Ambedkar in Kolhapur)

Related posts

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर

१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी

कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला शो फ्लॉप का झाला?