नवी दिल्ली : विरोधी खासदारांच्या गोंधळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आणि स्वरुप बदलून व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकांला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. विरोधकांनी या बिलाचा निषेध करताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या अंगावर कागद फेकले.
भाजप एनडीएने विकसित भारताची आपली योजना डोळ्यासमोर ठेऊन योजनेत बदल करत असल्याचा दावा केला आहे. तर नवीन रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधी यांचे नाव वगळण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. नवीन योजनेचे विकसत भारत गॅरंटी रोजगार अँड अजीविका मिशन म्हणजेज व्हीबी-जी राम-जी असे नामांतर केले आहे. (Papers were thrown at Shivraj Singh Chouhan)
मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी विरोधकांवर टीका करत विरोधी पक्ष बापूंच्या विचारांचा खून करत आहेत, असा आरोप केला. काल सभागृहात मी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सर्व सदस्यांची मते ऐकली. मात्र विरोधक आम्ही काही ऐकूनच घेत नाहीत. समोरच्या बाकावरील खासदारांचे काही ऐकूनच घ्यायचे नाही ही देखील एक प्रकारची हिंसा आहे, असा टोलाही त्यांनी मारला.
मंत्री चौहान म्हणाले, मनेरेगाऐवजी केंद्र सरकारच्या व्हीबी-जी राम जी या योजनेतून विकसित भारत २०४७ या संकल्पाला हातभार लावणे. ग्रामीण विकासाचा पाया रचणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मागील वीस वर्षामध्ये मनेरेगाने ग्रामीण कुटुंबाला रोजगार दिला. पण आता गावांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्या आधारावर ही योजना अधिक व्यापक व मजबूत करणे आवश्यक असून आम्ही तेच करत आहोत, असा दावा केला. विधेयक मंजूर झाल्यावर विरोधकांनी चौहान यांच्या अंगावर कागद फेकून निषेध केला. (Papers were thrown at Shivraj Singh Chouhan)
प्रियांका गांधीचा कडाडून विरोध .. प्रियांका गांधींनी या विधेयकाला विरोध केला आहे. या नवीन विधेयकामध्ये रोजगाराचे दिवस १०० वरुन १२५ करण्याचा दावा केला आहे. हे सरकाराचे थोतांड आहे. पुढच्या काही महिन्यात मनरेगा योजना संपुष्टात येईल, अशी भिती व्यक्त केली. नव्या विधेयकांमुळे राज्य सरकारचे ओझं वाढणार आहे. राज्य सरकारवर या योजनेचा आर्थिक भार वाढणार असून ते या योजनेसाठी पैसे देणे बंद करतील. हळूहळू मनरेगा नष्ट होईल. कारण राज्य सरकारकडे या योजनेसाठी देण्यासाठी पैसेच नाहीत. (Papers were thrown at Shivraj Singh Chouhan)