पंतप्रधान घाबरल्याने सभागृहात आले नाहीत : प्रियांका गांधी

PM did not come to the house because he was scared

नवी दिल्ली : राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत विरोधी खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार प्रस्तावाला आज उत्तर देता आले नाही. पंतप्रधान घाबरल्याने सभागृहात आले नाहीत, अशी टीका काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी केली.

आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता तहकुबीनंतर लोकसभेचे कामकाज सुरू झाले. सभागृहातील आठ खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस खासदार वेलमध्ये उतरले. विरोधी पक्षातील महिला खासदारांनी पंतप्रधानाच्या आसनाकडे मोर्चा वळवला. ‘जे योग्य आहे, ते करा’ असे लिहिलेले मोठे बॅनर त्यांनी सत्ताधारी बेंचला दाखवले. यावेळी अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव आणि किरण रिजजू विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले.  यावेळी पीठासनावर असलेल्या कार्यवाहक अध्यक्ष संध्या राय यांनी कामकाज तहकूब केले. (PM did not come to the house because he was scared)

निशिकांत दुबे बुलेट ट्रेनसारखे पळून गेले

संसदेतून बाहेर पडताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान मोदी घाबरले होते म्हणून ते सभागृहात आले नाहीत अशी टीका केली. केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भाजप खासदार निशिकांत दुबे बुलेट ट्रेनसारखे पळून गेले असे त्या म्हणाल्या.

राहूल गांधी यांनी पंतप्रधान सत्याला सामोरे जाऊ इच्छित नाहीत अशी टीका केली. “मी म्हटल्याप्रमाणे, पंतप्रधान मोदी संसदेत येणार नाहीत कारण ते घाबरले आहेत आणि सत्याचा सामना करू इच्छित नाहीत,” असे राहुल यांनी एक्स वर सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. एक्सवरील दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की हे पुस्तक भारताच्या माजी लष्करप्रमुखांनी लिहिले आहे, कोणत्याही विरोधी नेत्याने किंवा परदेशी लेखकाने लिहिलेले नाही. “आज, जर पंतप्रधान संसदेत आले तर मी त्यांना एक पुस्तक भेट देईन. हे पुस्तक कोणत्याही विरोधी नेत्याचे नाही. हे पुस्तक कोणत्याही परदेशी लेखकाचे नाही. हे पुस्तक देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, कॅबिनेट मंत्र्यांच्या मते, हे पुस्तक अस्तित्वातच नाही,” असे त्यांनी लिहिले. (PM did not come to the house because he was scared)

विरोधकांचे वागणे मुलासारखे

विरोधी पक्षांच्या वर्तनावर सत्ताधाऱ्यांनी टीका करताना त्यांचे वागणे मुलांसारखे होते अशी टीका केली. केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी विरोधकांच्या गोंधळाला दुर्दवी घटना असे म्हणत राष्ट्रवादीच्या अभिभाषणादरम्यान असा गोंधळ पहिल्यांदाच झाला आहे. ते मुलांसारखे वागत आहेत. त्यांना वाटते की हे नेहरु कुटुंबाचे राज्य आहे, काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे, सोनिया गांधींचे घर आहे अशी टीका केली

महिला खासदारांची पंतप्रधानांवर हल्ला करण्याची इच्छा

खासदार मनोज तिवारी यांनी विरोधकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या अशी टीका केली. विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधान जिथे बसतात तिथपर्यंत चढून आले होते. महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खूर्चीला घेराव घातला. त्यांचे हावभाव पाहता त्यांची पंतप्रधानांवर हल्ला करण्याची इच्छा असावी असे वाटत होते असा आरोप केला.

गोंधळाच्यावेळी पंतप्रधान सभागृहात नव्हते

भाजपच्या आरोपांना काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी चोख प्रत्युत्तर दिले. सभागृहातील गोंधळाच्यावेळी पंतप्रधान सभागृहात नव्हते. निशिकांत दुबे यांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधान केली. मी. ज्योतीमणी, गनीबेन ठाकूर त्यांना विचारण्यासाठी त्यांच्या बाकाकडे निघालो असताना आम्हाला पाहून निशिकांत दुबे पळू लागले. म्हणून आम्ही पळतोय, पळतोय असे म्हणाले. तिथे कोणालाही मारहाण किंवा हल्ल्याचा प्रयत्न झालेला नाही. (PM did not come to the house because he was scared)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या