मुंबई : प्रतिनिधी : आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. पण देशाची संसदीय लोकशाही टिकवायची आहे. मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आणि मला एक व्हावे लागेल. याच भावनेतून सर्व नेते एकत्र आलो आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी केले. (Pawar’s appeal to unite)
सदोष मतदारयादीच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढला. यावेळी झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. आजच्या मोर्चाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मोर्चाची आठवण झाल्याचे सांगून संयुक्त महाराष्ट्रासाठी जशी चळवळ होती तशी सगळ्यांची एकजूट आज दिसून येत आहे. पवार म्हणाले, आज आपण स्वत:साठी काही मागत नाही. फक्त लोकशाहीमध्ये संविधानाने जो आधिकार तुम्हा आम्हाला दिला आहे त्याचे जतन करण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणूकीत जे काही प्रकार झाले त्यामुळे सामान्य माणसाच्या लोकशाहीवरील विश्वासाला धक्का बसला आहे, असे शरद पवार म्हणाले. (Pawar’s appeal to unite)
शरद पवार म्हणाले, आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो आहे. या सगळ्याला तोंड द्यावे लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकांमध्ये संघर्ष असू शकतात, पण या सगळ्या गोष्टी विसरुन आपल्याला एक व्हावे लागेल. लोकशाहीचा जो अधिकार आहे तो आपल्याला जतन करावा लागेल. हाच दृष्टीकोन समोर ठेवून आपल्याला वाटचाल करावी लागेल. (Pawar’s appeal to unite)
काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केली. बनावट आधारकार्ड तयार करून मिळतात अशा त्या तक्रारी होत्या. कलेक्टर म्हणाले सिद्ध करा, पुरावे दिले गेले. मात्र ज्यांनी आरोप केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला समर्थन देत आहेत, याकडेही पवारांनी लक्ष वेधले. आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. पण देशाची संसदीय लोकशाही ही टिकवायची असेल, मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आणि मला एक व्हावे लागेल. आज व्यासपीठावर असलेले नेते याच भावनेतून एकत्र आले आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेही भाषण झाले. (Pawar’s appeal to unite)