सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंच विरोधातील याचिका फेटाळली

Supreme Court dismissed the petition against Kolhapur Circuit Bench

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी फेटाळली. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या पीठाने हा निर्णय दिला. कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना सर्वांना न्याय मिळवू देण्याच्या घटनात्मक दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. (Supreme Court dismissed the petition against Kolhapur Circuit Bench)

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यासाठी १८ ऑगस्टला तत्कालिन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंचचे उद्घाटन झाले. सहा जिल्ह्यातील वकिलांचा गेली चाळीस वर्षे खंडपीठासाठी लढा सुरू होता. भूषण गवईंनी सर्किट बेंचसाठी पुढाकार घेतला होता. सर्किट बेंच स्थापनेच्या विरोधात अड रणजीत बाबूराव निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन.व्ही. अंजानिया यांच्या पीठासमोर गुरुवारी अंतिम सुनावणी झाली. दोन्ही न्यायमूर्तींनी अड निंबाळकर यांची याचिका फेटाळून लावली. सर्किट बेंचचा निर्णय सर्वसामान्याच्या हिताचे असल्याचे स्पष्ट केले. (Supreme Court dismissed the petition against Kolhapur Circuit Bench)

राज्य पुनर्रचना कायदा १९५६ च्या कलम ५३ (३) नुसार सरन्यायाधीशांना मिळालेल्या अधिकारातून हा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणाचाही अधिकाराचे उल्लंघन होत नाही. उलट मुंबई उच्च न्यायालयापासून दूर अंतरावर असलेल्या पक्षकारांना न्याय मिळणे सुलभ झाल्याचे निरीक्षक सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. राज्य सरकारच्यावतीने भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अड संदीप देशमुख यांनी बाजू मांडली. (Supreme Court dismissed the petition against Kolhapur Circuit Bench)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक