नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायलने इराणमधील ३० हून अधिक विद्यापीठावर हल्ले केले आहेत. या युद्धात दोन्ही देश शैक्षणिक आणि संशोधन स्थळांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इराणने केला आहे.
इराणचे विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञान मंत्री हुसेन सिमाई सर्राफ यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्त्रायलकडून लष्करी नसलेली ठिकाणे आणि शिक्षण, संशोधनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे, असे वृत्त आयएसएनए च्या हवाल्याने सीएनएनने दिल आहे. त्यामुळे लाखो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण आणि संशोधनापासून वंचित राहिले आहेत. (Over 30 universities in Iran attacked during the war)
इराणमधील स्थानिक माध्यमांनुसार, तेहरानमधील शहीद बेहेश्टी विद्यापीठातही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इमारतींना लक्ष्य करण्यात आले होते. शैक्षणिक संस्थांवरील या हल्ल्यांना देशाचा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Over 30 universities in Iran attacked during the war)
हे हल्ले इराणचा अणुकार्यक्रम कमकुवत करण्याच्या उद्देशाने चालवलेल्या व्यापक मोहिमेचा भाग आहेत असा दावा इस्त्रालयने केला आहे. जाणूनबुजून नागरी ठिकाणांना लक्ष्य केले जात नाही असे अमेरिकेकडून म्हटले जात आहे. प्रत्युत्तरादाखल, तेहरानने इशारा दिला आहे की ते या प्रदेशातील अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित विद्यापीठांना लक्ष्य करू शकते. (Over 30 universities in Iran attacked during the war)