शरद पवारांनी घेतली राज्यसभेत खासदारकीची शपथ

Sharad Pawar took the oath as a Member of Parliament in the Rajya Sabha

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. उप राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधीसाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले होते. गेले काही दिवस अशक्तपणा आल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज व्हिलचेअरवरुन ते शपथविधीसाठी राज्यसभेत आले होते. शरद पवारांनी तिसऱ्यांदा राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली आहे. (Sharad Pawar took the oath as a Member of Parliament in the Rajya Sabha)

पवारांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे रामराव वडकुते, माया ईवनाते आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांचाही शपथविधी झाला. वडकुते, ईवनाते आणि वाघमारे प्रथमचे राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यसभेच्या बिनविरोध निवडी झाल्या होत्या. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच भाजपकडून विनोद तावडे, आरपीआयचे रामदास आठवले, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, भाजपचे रामराव वडकुते, माया ईवनाते आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. विनोद तावडे दहा एप्रिलला तर पार्थ पवार नऊ एप्रिलला शपथ घेणार आहेत. (Sharad Pawar took the oath as a Member of Parliament in the Rajya Sabha)

शरद पवार हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. २०१४ मध्ये ते राज्यसभेवर ते पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर २०२० आला ते राज्सभेवर बिनविरोध निवडून आले होते. २०२६ मध्येही राज्यसभेवर महाविकास आघाडीकडून ते बिनविरोध निवडून आल आहेत. (Sharad Pawar took the oath as a Member of Parliament in the Rajya Sabha)

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर