मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

Nitesh Rane sentenced to one month of imprisonment

जमीर काझी : मुंबई : राज्याचे मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने एका प्रकरणात झटका दिला आहे. सिंधुदुर्गात सात वर्षांपूर्वी महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक करून  सार्वजनिक शांततेचा भंग करणे त्यांना महागात पडले आहे. या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवित एक महिना कारावास आणि एक लाखाचा दंड अशी शिक्षाही ठोठावण्यात आहे. (Nitesh Rane sentenced to one month of imprisonment)

 सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीशांनी मात्र या आदेशाविरुद्ध दाद मागण्यासाठी एक महिन्याची स्थगिती दिली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश  व्ही. एस. देशमुख यांनी सोमवारी हा निकाल दिला. मात्र या आदेशाविरुद्ध दाद मागण्यासाठी शिक्षेला एक महिन्याची स्थगिती दिली आहे. या प्रकरणात राणे वगळता अन्य २९ संशयिताची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. (Nitesh Rane sentenced to one month of imprisonment)

  ४ जुलै २०१९ रोजी मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या पाहणीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार नितेश राणे  गेले होते. राणे यांनी महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांना  गडनदी पुलावर बोलावून त्यांच्या अंगावर चिखल टाकला होता. तसेच  त्यांना बांधून  चिखलातून चालत नेले होते. त्यांच्या या कृतीविरुद्ध सर्वस्तरातून संताप व्यक्त झाला होता. त्याबाबत प्रकाश शेडेकर व राज्य सरकारी अधिकारी संघटनेने त्याबद्दल राणे आणि त्यांच्या साथीदारविरुद्ध तक्रार दिली होती. त्याची सुनावणी ओरोस येथील जिल्हा न्यायालयात झाली. यातील सरकारी कामात हस्तक्षेप प्रकरणात राणे यांच्यासह अन्य संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून, सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या गुन्ह्यात मात्र शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले, तर संशयित आरोपीच्यावतीने अ‍ॅड संग्राम देसाई यांनी काम पाहिले. (Nitesh Rane sentenced to one month of imprisonment)

Related posts

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी