सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

Sarpanch and his Son Demand Bribe of Ten Thousand

कोल्हापूर : प्रतिनिधी : सरपंच आणि त्यांच्या मुलाने दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील सरपंच संगीता रमेश कांबळे (वय ४२) आणि निकेत रमेश कांबळे (वय ३०) अशी संशयितांची नावे आहेत. (Sarpanch and his Son Demand Bribe of Ten Thousand)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. तक्रारदाराने पत्नीच्या नावे नावाने शेडनेटचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ग्रामपंचायतीकडे व्यवसाय परवान्याची मागणीसाठी रितसर अर्ज केला होता. यासंदर्भात तक्रारदार हे जैनापुरचे सरंपच संगीता कांबळे यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या अर्जाची पडताळणी केली असता सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती नऊ हजारांची लाच मागितल्याचे निष्पण्ण झाले. (Sarpanch and his Son Demand Bribe of Ten Thousand)

त्यानंतर लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पंच आणि साक्षीदारासमक्ष सरंपच संगिता कांबळे आणि त्याचा मुलगा निकेत यांनी तक्रारदाराचे काम पूर्ण न झाल्याने त्याच्याकडून लाच घेण्यास नकार दिला. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पैसे घेतो असे सांगितले. त्यानंतर दोघांविरोधात जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस निरीक्षक उज्वला भडकमकर, पोलिस निरीक्षक सुनील मोरे, सुधीर पाटील, हेड कॉन्स्टेबल संगीता गावडे, संदीप पवार यांनी कारवाई केली. (Sarpanch and his Son Demand Bribe of Ten Thousand)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी