जनरेशन झेडचा नवा लढाऊ चेहरा…. नेहा बोरा

Neha Bora, Delhi, AISA, Delhi protests.

दिल्लीत ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टी, इंडिया आघाडीने रस्त्यांवर उतरुन आंदोलन करुन मोदी शाह सरकारला भंडावून सोडलं आहे. या आंदोलनात रस्त्यावर उतरुन, बॅरिकेटरवर चढून, पोलिसांना चकवा देणारी  २७ वर्षीय नेहा बोरा देशभरातील तरुणाईची रोल मॉडेल बनली आहे. तिचे आई वडील कट्टर भाजप समर्थक असतानाही नेहा बोरा डाव्या विचारसरणीकडे झुकली. दिल्लीत पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात ती अग्रभागी होती. सोनम वांगचूक यांच्यासमवेत ती सलग २३ उपोषणास बसली होती. तिचे आठ किलो वजनही कमी झाली आहे. काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात ती राहूल गांधी, प्रियांका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात अग्रभागी होती. (Neha Bora, a young face of the Left movement)

सतीश घाटगे

नेहा नाट्य कलाकार आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ती आहे. ऑल इंडिया स्टुंडट्स असोसिएशन (आयसा) संघटनेत दहा वर्षे कार्यरत असून सध्या या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात नेहा बोरा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. महिला पोलिसा तिला रस्त्यावरुन फरफटत नेत आहेत. बॅरिकेटस् वर चढून पोलिसांच्या समोर मुठी आवळून त्वेषाने ती घोषणा करत असलेले व्हिडिओ भारतीयांना अपील होत आहेत. भाजपच्या ट्रोल टीमने तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करुन तिची प्रसिद्धी दिवसेदिवस वाढत आहे.

सीजीपीच्या आंदोलनात वांगचुक समवेत सलग २३ दिवस नेहाचे उपोषण

दिल्लीमध्ये जुलै महिन्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात ती सहभागी झाली. सीजेपीच्या समर्थनात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण सुरू केले. नेहा व तिच्या आयसा संघटनेतील काही जण उपोषणात सहभागी झाले. वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतरही नेहाने आपला लढा सुरूच ठेवले होते. आठ किलो वजन कमी होऊनही तिने सलग २३ दिवस उपोषण सुरूच ठेवले होते. नेहाने स्वत: ला जनरेशन झेडच्या नेत्या म्हणून प्रस्थापित केले आहे. (Neha Bora, a young face of the Left movement)

राजकारणात येण्यापूर्वी रंगभूमीवर सक्रीय

उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या नेहाचे वडील लष्करी अधिकारी आहेत. बदलीमुळे ती वेगवेगळ्या शहरामध्ये फिरली आहेत. दिल्लीतील हिंदू विद्यापीठात समाजशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तरची पदवी घेतली. आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) नाट्य आणि सादरीकरण कला कला आणि सौदर्यशास्त्र या विषयावर पीएचडीचे शिक्षण घेत आहे. राजकारणात येण्यापूर्वी ती रंगभूमीवर सक्रीय होती. तिच्या भाषणातील अचूक शब्दफेक, खणखणीत आवाज, आवाजातील चढ उतार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची तिची नाट्यमय शैली ही रंगभूमीची देणगी आहे.  

आई-वडील भाजपचे कट्टर समर्थक

तिचे आई वडील कट्टर भाजप समर्थक असूनही ती डाव्या विचारसरणीच्या राजकारणाकडे वळली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह आणि भाजप नेत्यांवर तिने केलेल्या टीकेमुळे कुटुंबासमवेतही तिचे बरेच मतभेद झाले आहेत. मुख्यमंत्र्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याबद्दर उत्तर प्रदेशात तिच्याविरोधात पोलिस ठाण्यात तीन तक्रारीही दाखल झाल्या आहेत. नेहाला ठार मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत. झारखंडमध्ये एका निषेध मोर्चादरम्यान एका व्यक्तीने तिच्यावर शाई फेकल्याच्या घटनेनंतर ती चर्चेत आली. नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर कलेल्या एका फोटोत तिचा चेहरा शाईने माखलेला दिसत होता. शाई फेकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले. डाव्या विचारांशी ठाम असणारी आणि तरुणाईच्या प्रश्नांची जाण असणारी नेहा बोरा एका आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत आहे.    (Neha Bora, a young face of the Left movement)

Related posts

अजितदादांनंतर सुनेत्रा पवाराचे सहकारातील दणदणीत यश

इंडिया आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा

व्होटचोर रंगा -बिल्लाला सत्तेतून खाली खेचणार  : हर्षवर्धन सपकाळ