अजितदादांनंतर सुनेत्रा पवाराचे सहकारातील दणदणीत यश

Sunetra Pawar's resounding success in the cooperative sector

कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीची धुरा सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सहकारात दणदणीत विजय मिळवत नेतृत्वाची नवी चुणुक दाखवली आहे. घरच्याच मैदानावर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. अजितदादा गटातून फुटून जात बंडखोरी करणाऱे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगपात यांचाही पराभव झाला आहेत. जगताप यांनी बंडखोरी करत भाजपसोबत पॅनेल तयार केले होते. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांच्या पॅनेलला पराभवास सामोरे जावे लागले. (Sunetra Pawar’s resounding success in the cooperative sector)

निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनेल

अजित पवारांच्या निधनानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी अमोरासमोर आल्याने संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष होते. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल रिंगणात होते. तर जय पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल रिंगणात होते. अजित पवार गटातून फूट पाडून कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल हे तिसरे पॅनेल होते. २१ जागांसाठी तीन पॅनेलचे ६२ आणि २१ अपक्ष असे ८३ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर रोजी ८४.२५ टक्के मतदान झाले. (Sunetra Pawar’s resounding success in the cooperative sector)

विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव

मतमोजणीनंतर निकाल समोर आला असून अजित पवार गटाचे सर्व २१ उमेदवार विजयी झाले. बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जगताप यांनी वाणेवाडी येथून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून विक्रम भासले तर युगेंद्र पवार यांच्या पॅनेलमधूल राजेंद्रकुमार जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. विक्रम भोसलेंना १३ हार ८६४ मते मिळाली तर पुरुषोत्तम जगताप यांना ७३६४ मध्ये मिळाली. जगतापांचा ६४९० मतांनी पराभव झाला. (Sunetra Pawar’s resounding success in the cooperative sector)

Related posts

आमदार गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज अवैध

करवीर निवासिनी अंबाबाईची भीमादेवी रुपात अलंकार पूजा

शासनाच्यावतीने १४ नोव्हेंबरला शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी कार्यक्रम