पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने २४३ विधानसभा जागांपैकी २०५ जागांवर दणदणीत विजय मिळवला. बिहारच्या राजकारणात सर्वात जास्त ९१ जागा जिंकून मोठा पक्ष बनला आहे. नीतीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडने ८२ जागा जिंकून विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव यांच्या काँग्रेस, डावे आणि अन्य पक्षांनी खराब कामगिरी केली आहे. महागठबंधन ची गाडी ३१ जागांवर थांबली . नीतिशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असून महिला वर्गाने एनडीएच्या पारड्यात भरभरुन दान दिल्याने मोठ्या विजयाची नोंद केली आहे. . (NDA on the verge of victory in Bihar)
भाजप आणि जयदु या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. भाजपने ९१ तर जागांवर तर जेडयू ३१ जागांवर आघाडीवर आहे. लोजपने चांगली कामगिरी केली आहे. महागठबंधनचे तेजस्वी यादव राघोपूरमधून आघाडीवर आहेत. त्यांना विजयासाठी झगडावे लागत आहे. तर त्यांचे बंधू तेजप्रताप यादव पिछाडीवर आहे. तेजप्रताप यांची आरजीडीमधून हकालपट्टी करण्यात आली होती. आरजेडी ४१ जागांवर तर काँग्रेस अवघ्या चार जागांवर आघाडीवर आहे. (NDA on the verge of victory in Bihar)
३८ जिल्ह्यामध्ये मतमोजणी सुरू आहे. सुरवातीपासून एनडीएच्या उमेदवारांनी मुसंडी मारली असून एकदंरीत कल बघता एनडीएचा विजय जवजळपास निश्चित झाला आहे. या निवडणुकीत जेडीयूने दमदार कामगिरी केली आहे. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला ४३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्याचे उमेदवार ७५ जागांवर आघाडीवर आहेत. त्यांना ३२ जागांचा सद्यस्थितीत फायदा दिसून येत आहे. भाजपला १५ जागा जादा मिळण्याची शक्यता दिसत आहे. २०२० मध्ये भाजपला ७४ जागा मिळाल्या होत्या. आता त्यांचे ९१ जागा मिळवून सर्वात जास्त जागा मिळवणारा भाजप मोठा पक्ष बनला आहे. आरजेडीला मोठ फटका बसला आहे. गेल्या निवडणुकीत ७५ जागा त्यांना मिळाल्या होत्या. आता त्यांना २७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची कामगिरी सुमार झाली आहे. त्यांना १५ जागांचा फटका बसला आहे. गतवेळच्या निवडणुकीत १९ जागांवर विजय मिळवलेल्या काँग्रेसचे उमेदवार चार ठिकाणी विजयी झाले आहेत. (NDA on the verge of victory in Bihar)
बिहारमधील बलाबल असे
एनडीए २०५
महागठबंधन ३१
इतर ०७