Murder by strangulation with cable : शिवी दिल्याच्या कारणावरुन मित्राचा केबलने गळा आवळून खून

Murder by strangulation with cable

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा इलेक्ट्रिक केबलने गळा दाबून खून केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली. पोलिसांनी अवघ्या सहा तासात खुनाचा छडा लावत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Murder by strangulation with cable)

आज सोमवारी पहाटे हॉकी स्टेडियमकडे जाणाऱ्या विश्वपंढरी मंदिरासमोरील फुटपाथवर इलेक्ट्रिक पोलच्या खांबाला केबलने गळा आवळून खून केल्याचा माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि पोलिस पोहोचले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना संशयिताची ओळख पटवली. पोलिसांनी मनिष जालिंदर राऊत (वय २८ रा. कळंबा रिंग रोड, राऊत कॉलनी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.  मनिष आणि सिद्धू शंकर बनवी ( वय २०, रा. वाशी नाका, कळंबा रोड)  हे दोघे जेवायला गेले होते. दोघांनी मद्यपान केले होते. जेवण करुन घरी परत असताना दोघांमध्ये हॉकी स्टेडियम परिसरात वाद झाला. सिद्धू बनवीने मनिष राऊतला आईवरुन शिवी दिली. त्यामुळे रागाच्या भरात सिद्धूला ढकलले. तो विजेच्या खांबाजवळ पडला. इलेक्ट्रिक पोलला लोंबकळणाऱ्या केबलने मनिष राऊतने सिद्धू बनवीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मनिष सिद्धूची मोटर सायकल घेऊन त्याच्या घरी गेला. तिथे त्याची मोटार सायकल पार्क स्वत:च्या घरी गेला. (Murder by strangulation with cable)

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस अंमलदार वैभव पाटील, सुरेश पाटील, योगेश गोसावी, समीर कांबळे, रोहित मर्दाने, संतोष बरगे, परशुराम गुजरे, संजय हुंबे, हिंदूराव केसरे, महेश खोत, सतीश जंगम, संदीप बेंद्रे, महेश पाटील, सागर माने, विनायक चौगुले, प्रदीप पाटील, युवराज पाटील, अमित सर्जे, सतीश सूर्यवंशी यांनी केला. (Murder by strangulation with cable)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर