नवी दिल्ली : उप राष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा राज्यसभेच्या कामकाजाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या स्वागतपर भाषणात विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी धनगडांवर केलेल्या वक्तव्याने राज्यसभेत गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजपने खर्गे यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला. धनकडावरील वक्तव्याने पहिला दिवस राज्यसभेत विरोधकांनी गाजवला.
राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी सी. पी. राधाकृष्णन यांना उद्देशून म्हटले की, मला आशा आहे की, आपण दोन्ही बाजूंना समान न्याय द्याल. आपण आपल्या आसनावरून सत्तापक्षाकडे फार लक्ष देऊ नका, कारण तिकडे धोका आहे आणि विरोधकांकडे बघितले नाही, तरी धोका आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूंमध्ये संतुलन राखले तर बरे होईल, असा सल्ला खर्गे यांनी दिला. त्यामुळे भाजपा नाराज झाली होती, त्यातच मल्लिकार्जुन खर्गे यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे नाव घेत भाजपावर निशाणा साधला. (Kharge’s statement creates ruckus in Rajya Sabha)
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मला आशा आहे की, या सभागृहात आधीच्या राज्यसभा सभापतींच्या अचानक निघून जाण्याचा उल्लेख केल्यास तुम्हाला हरकत नसेल. कारण या सभागृहाला त्यांना (जगदीप धनखड) निरोप देण्याची संधी मिळाली नाही, याचे मला दुःख आहे. तरीही, संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीने मी त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी जोरदार विरोध केला मंत्री जे.पी. नड्डा यांनीही खर्गे आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. . त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. (Kharge’s statement creates ruckus in Rajya Sabha)
पंतप्रधान मोदी यांनी उप राष्ट्रपती राधाकृष्णन यांचे कौतुक करताना म्हटले की, “मी तुम्हाला खात्री देतो की या सभागृहात बसलेले सर्व सदस्य, वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा राखत असताना, तुमच्या प्रतिष्ठेचा देखील नेहमीच आदर करतील. मी तुम्हाला खात्री देतो की, सर्व सदस्य या सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवतील. कारण आमचे अध्यक्ष एका सामान्य पार्श्वभूमीतून, शेतकरी कुटुंबातून आले आहेत आणि त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले आहे. (Kharge’s statement creates ruckus in Rajya Sabha)