महानगरपालिका निवडणूक ‘संक्राती’ला

Municipal corporation elections on 'Makar Sankranti'

मुंबई : प्रतिनिधी : सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या मकर संक्राती सणाचा दिवस मतदानासाठी निवडत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला घेण्याची घोषणा केली आहे. १५ जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निवडणूकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात तब्बल पाचवर्षानंतर महापौर विराजमान होण्याच् शक्यता आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता सुरू झाली आहे. (Municipal corporation elections on ‘Makar Sankranti’)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कडोंमपा, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली मिरज, नांदेड, अमरावती, नागपूर, अकोला, चंद्रपूर, जळगाव, धुळे, नाशिक यासह २९ महानगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रमांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदत दिली आहे. मुंबई वगळता २८ महानगरपालिकेत चार सदस्यीय निवडणूक होणार आहे. उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. (Municipal corporation elections on ‘Makar Sankranti’)

अर्ज दाखल करण्याची मुदत २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर असा कालावधी राहणार आहे. अर्जांची छाननी ३१ डिसेंबरला होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी मुदत फक्त दोन दिवस ठेवली आहे. दोन जानेवारीला दुपार तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप तीन जानेवारीला होणार आहे. १५ जानेवारी मतदान तर १६ जानेवारीला मतदान होणार आहे. (Municipal corporation elections on ‘Makar Sankranti’)

२९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

अर्ज दाखल करण्याची मुदत, २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५

अर्जांची छाननी – ३१ डिसेंबर २०२५

अर्ज मागे घेण्याची मुदत  २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप/उमेदवारी अंतिम यादी ३ जानेवारी २०२६

मतदानाची तारीख – १५  जानेवारी 2026
मतमोजणी  १६ जानेवारी २०२६

एकूण मतदार केंद्र

  • एकूण मतदार – 3.48 कोटी
  • एकूण मतदार केंद्र – 39,147
  • मुंबईसाठी मतदार केंद्र – 10,111
  • कंट्रोल यूनिट – 11,349
  • बॅलेट यूनिट – 22,000

किती जागांवर होणार पालिका निवडणूक?

  • 29 महापालिकांमधील एकूण जागा – 2869
  • महिला – 1442
  • अनु. जाती – 341
  • अनु. जमाती – 77
  • मागास प्रवर्ग – 769

महापालिका निवडणुकीत खर्चाची मर्यादा किती?

  • अ वर्ग – 15 लाख
  • ब वर्ग – 13 लाख
  • क वर्ग – 11 लाख
  • ड वर्ग – 9 लाख

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या