सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

Mother-in-law commits theft in son-in-law's house

बेळगाव : प्रतिनिधी : दोन मुलींच्या लग्नामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरातील साडे सोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. जावयाने घरातील दागिने चोरी झाल्याची टिळकवाडी पोलीसात तक्रार दिल्यावर सासूनेच दागिने चोरल्याचे पोलीस तपासात उघड झाले.पोलिसांनी सासूची रवानगी हिंडलगा जेलला केली. (Mother-in-law commits theft in son-in-law’s house)

                    अनगोळ येथील यल्लाप्पा इराप्पा कम्मार हे आपल्या पत्नी सोबत लग्नाला गेले होते. यावेळी त्यांची सासू उज्वला कम्मार हिने आपला नातेवाईक शिवा अप्पयनवर याच्या मदतीने जावयाच्या बेडरूम मधील तिजोरी खोलून एकशे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. लग्नाहून आल्यावर जावई यल्लापा याने पैसे ठेवण्यासाठी तिजोरी उघडली असता तिजोरीतील दागिने गायब झाल्याचे समजले. या संबंधी सासू उज्वला हिला विचारल्यावर तिने आपणास माहित नसल्याचे सांगितले. नंतर यल्लापा याने टिळकवाडी पोलिसात तक्रार दिली. (Mother-in-law commits theft in son-in-law’s house)

पोलीसांनी चौकशीसाठी उज्वला हिला बोलावले असता तिने आरडा ओरड करून गोंधळ घातला. नंतर पोलीसांनी कसून चौकशी केल्यावर उज्वला हिने आपला नातेवाईक शिवा अप्पयनवर याच्या मदतीने तिजोरी खोलून दागिने चोरल्याची कबुली दिली. नंतर पोलीसांनी उज्वला आणि शिवा यांच्याकडून नेकलेस, गंठण, अंगठी आणि अन्य सोन्याचे दागिने असे एकशे दहा ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले. (Mother-in-law commits theft in son-in-law’s house)

Related posts

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ

बारावीच्या परीक्षेत विवेकानंद कॉलेज अव्वल