Monsoon in Kerala: मान्सून एक आठवडा आधीच केरळमध्ये

Monsoon in Kerala

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा एक आठवडा आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. जवळपास १६ वर्षानंतर ही पुनरावृत्ती झाली आहे. दरम्यान केरळमध्ये शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Monsoon in Kerala)

नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने  शनिवारी (२४ मे) जाहीर केले. नैऋत्य मान्सून सर्वसाधारणपणे १ जूनच्या दरम्यान दाखल होत असतो, तथापि तो यावेळी २४ मे रोजी दाखल झाला आहे.

जवळपास १६ वर्षांनी मान्सून लवकर येण्याची पुनरावृत्ती झाली आहे. २००९ मध्ये जेव्हा तो २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर यावर्षी याचदरम्यान दाखल झाला आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. (Monsoon in Kerala)

केरळमधील तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, अलाप्पुझा, त्रिशूर, इडुक्की आणि मलप्पुरम जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यापूर्वी रेड अलर्ट जारी केला होता.

केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे विविध ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. फांद्या तुटून पडल्या, त्यामुळे वीजवाहिन्या तुटल्या. वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला.

दरम्यान, हवामान विभागाने २४ मे रोजी नऊ जिल्ह्यांमध्ये, २५ मे रोजी सात, २६ मे रोजी चार आणि २७ मे रोजी सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. (Monsoon in Kerala)

मान्सून लवकरच महाराष्ट्रात

पुढील दोन ते तीन दिवस हवामान अनुकूल असल्याने नैऋत्य मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शनिवारी सांगितले. (Monsoon in Kerala)

पत्रकारांशी बोलताना, मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी भुते म्हणाल्या, “नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. तो १ जूनच्या दरम्यान केरळमध्ये येतो. मात्र आठवडाभर आधीच केरळच्या किनाऱ्यावर पोहोचला आहे.” अनुकूल हवामानामुळे त्याचे आगमन लवकर झाले आहे. मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने हळूहळू प्रगती करत आहे.

जोरदार पाऊस
दरम्यान, महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वत्र मान्सूनच्या पावसासारखी स्थिती आहे. सद्यस्थितीत वळीव झाल्यानंतर शेतीतील मशागतीच्या कामांना वेग येतो, मात्र पावसाने उसंतच दिली नसल्याने मशागतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पीक लावणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना यावर्षी या वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे.

हेही वाचा :
काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा पहेलगाम हल्ल्यावर बोला
पूंछमधील नागरिकांशी राहुल यांचा संवाद

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर