अहमदाबाद : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका आरोग्य कर्मचाऱ्याला पाकिस्तानी गुप्तहेरासोबत लष्करी आस्थापनांबद्दलची संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. सहदेवसिंह गोहिल (२८) असे त्याचे नाव आहे. (spy arrested)
पीटीआयच्या वृत्तानुसार, कच्छच्या सीमावर्ती जिल्ह्यात हा कंत्राटी पद्धतीने काम करतो.
आदिती भारद्वाज अशी ओळख सांगणाऱ्या पाकिस्तानी एजंटने गोहिलला आपल्या जाळ्यात ओढले. त्याला काही आमिषे दाखवली. बांधकाम सुरू असलेल्या तसेच सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणि भारतीय नौदलाच्या विद्यमान आस्थापनांबद्दल माहिती देण्यापोटी या एजंटाने त्याला आमिष दाखवले होते. (spy arrested)
गुजरात एटीएसचे एसपी के. सिद्धार्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘गुजरात एटीएसने कच्छ येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी सहदेव सिंग गोहिलला अटक केली. तो एका पाकिस्तानी एजंटसोबत बीएसएफ आणि आयएएफशी संबंधित माहिती शेअर करत होता, अशी माहिती आम्हाला मिळाली होती.
तो २०२३ मध्ये व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आला. जून २०२३ पासून तो तिला आयएएफ आणि बीएसएफच्या नवीन बांधलेल्या किंवा बांधकामाधीन असलेल्या जागांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत होता. त्यासाठी त्याला पैसे मिळत होते.’’
पाकिस्तानी एजंटने प्रथम लखपतमधील माता नो मढ गावातील एका सरकारी केंद्रात गोहिलशी संपर्क साधला. त्यानंतर ती त्याच्याशी सतत संपर्कात होती. त्यातून तिने त्याच्याशी मैत्री केली. (spy arrested)
“त्याचा विश्वास जिंकल्यानंतर, तिने बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या कार्यालयांचे आणि त्याच्या गावाभोवती सुरू असलेल्या बांधकामांचे फोटो आणि व्हिडिओ मागितले. गोहिलने ही माहिती व्हॉट्सअॅपद्वारे शेअर केली,” असे एसपी सिद्धार्थ म्हणाले. गोहिलला ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे माहीत होते.
जानेवारी २०२५ मध्ये, गोहिलने सिम कार्ड मिळविण्यासाठी त्याचा आधार (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) वापरला आणि पाकिस्तानी एजंटसोबत ओटीपी शेअर केला. त्यामुळे ती शेजारच्या देशातील त्या नंबरशी जोडलेले व्हॉट्सअॅप वापरू शकली.
एका माहितीच्या आधारे, त्याला १ मे रोजी चौकशीसाठी एटीएस कार्यालयात आणण्यात आले आणि त्याचा फोन फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. “फॉरेन्सिक विश्लेषणातून असे दिसून आले की गोहिल ज्या नंबरवर माहिती शेअर करत असे ते दोन्ही नंबर सध्या पाकिस्तानमधून ऑपरेट केले जात आहेत. आम्हाला असेही समजले की काही काळापूर्वी त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून ती माहिती शेअर करण्यासाठी ४०,००० रुपये रोख मिळाले होते,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
धुळ्याचा खजिना अनिल गोटेंनी रोखला
मोदी, शहांची नावे पुसली जातील…