मोदींनी पत्रकार परिषद घेण्याचे धाडस दाखवावे : संजय राऊत

Modi should hold a press conference

मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षात काय केले याची माहिती एक पत्रकार घेऊन धाडस दाखवावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ९ जून रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधान पदावर सर्वाधीक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रम मोडीत काढणार आहे. या मुद्द्यावर खासदार राऊत यांनी मोदींनी केदारनाथ गुफेत जाऊन १२ वर्षात काय केले याचे आत्मचिंतन करावे आणि त्याचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत मांडावा असे आव्हान दिले. (Modi should hold a press conference)

संजय राऊत यांनी मोदींवर टीका करताना म्हणाले, मोदी, शहा पक्ष फोडत आहेत. पण पंडीत नेहरुंनी कधीही विरोधी पक्ष फोडले नाहीत. त्यांच्या काळात त्यांच्या विरोधातील सरकारे आली. लोकसभा आणि राज्यसभेत सरकारच्या विरोधात बोलणारे नेते आले. त्यांनी नेहरुंच्या तोंडावर टीका केली. अटलबिहारी वाजपेयींनीही टीका केली. पण आमच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांचे पक्ष, संघटना घेण्याचा प्रयत्न मोदींनी कधीही केला नाही,

पंतप्रधानांनी १२ वर्षे घोडदौड करताना त्याखाली लोकशाही तुडवली गेली. देशाचा निवडणूक आयोग तुडवडा गेला. अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभे राहून त्यांची घोडदौड सुरू आहे. त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. (Modi should hold a press conference)

पंडीत नेहरु आणि मोदींची तुलना करताना संजय राऊत यांनी पंडीत नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेले एक तेजस्वी नेतृत्व होते. पंडीत नेहरू देशासाठी स्वत:ची सर्व संपत्ती दान केली. आज या संपत्तीची किंमत ८० हजार कोटी रुपये आहे. नेहरुंच्या काळात अदानी, अंबानी हे कोणी निर्माण केले नाहीत. नेहरुंनी सार्वजनिक उद्योग निर्माण केले. तेल कंपन्या, एलआयसी, आयआयटी या संस्था निर्माण केल्या. मोदींनी काय केले हे पत्रकार परिषदेत सांगायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. (Modi should hold a press conference)

Related posts

नागपुरात स्क्रीप्ट लिहिलेला शक्तीपीठ महामार्ग सिनेमा फ्लॉप ठरणार

सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजनांची हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

बेळगावच्या कित्तूरमध्ये पावसाने दाणादाण