अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?

Great Nicobar Island

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाला असलेले ग्रेट निकोबार बेट सध्या चर्चेत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार संपूर्ण ग्रेट निकोबार बेटावर एकूण फक्त आठ हजार लोक राहतात.

अदानींच्या हितासाठी प्रकल्प

२०२० च्या अखेरीस केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने ‘होलिस्टिक डेवलपमेंट ऑफ ग्रेट निकोबार आयलंड’ अर्थात ग्रेट निकोबार बेटाचा सर्वांगीण विकास, असे नाव दिलेल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला. सुरुवातीला अंदाजित खर्च ७२,००० कोटी रुपये असलेल्या या प्रकल्पाची किंमत वाढून आता ९२,००० कोटी रुपये झाली आहे. हा प्रकल्प नरेंद्र मोदी यांच्या जवळचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या हितासाठीच राबवला जात असल्याचा आरोप होत आहे. (Great Nicobar Island)

नौदल तळ विस्तार मागणीला नकार

गेली पाच वर्षे आयएनएस बाझ या महत्त्वाच्या सामरिक नौदल तळाच्या विस्ताराची मागणी केली जात होती; मात्र मोदी सरकारने त्याला मंजुरी दिली नाही. त्याच परिसरात अडानी समूहाला बंदर, टाउनशिप, कॅसिनो आणि मॉल्स उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली, असा आरोप केला जात आहे.

ग्रेट निकोबारची लोकसंख्या सध्या अवघी ८,००० इतकी आहे. मात्र या प्रकल्पाअंतर्गत तेथे पाच लाखांहून अधिक लोकांना वसवण्याची योजना आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला नेमका काय फायदा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शॉम्पेन अदिवासी जमातीचे २०० लोक उरलेत

निकोबार बेटांवर शॉम्पेन ही आदिवासी जमात राहते. जगभरात या जमातीचे अवघे २०० लोक उरले असल्याचे सांगितले जाते. या प्रकल्पामुळे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. The sacrifice of Great Nicobar Island)

निकोबार हा भूकंपाच्या सहाव्या श्रेणीतील अतिधोकादायक क्षेत्रात मोडतो. अशा अत्यंत संवेदनशील भागात पाच लाख लोकांना वसवणे सुरक्षित ठरेल का, असा सवाल पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

दीड कोटी झाडे तोडणार?

अंदमान-निकोबारमध्ये सुमारे दीड कोटी झाडे तोडली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. ही जंगले पर्यावरणीय संतुलन, जैवविविधता आणि किनारी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यांचा विनाश झाल्यास त्याचे परिणाम किती गंभीर असतील, याची कल्पनाही करणे कठीण आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा प्रकल्प म्हणजे “मनमानी आणि हुकूमशाही वृत्तीचे उदाहरण” असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. या प्रकल्पाविरोधात लोकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Great Nicobar Island)

Related posts

ठाकरे, पवारांच्या पंगतीला ममता बॅनर्जी येणार?

१५ लाख कोटींचा डोलारा, एलआयसी ला १६०० कोटींचा फटका

कॉक्रोच जनता पार्टी ही संघाची `बी टीम` आहे का?