Matthew Whitaker : युक्रेनविरोधातील युद्धात भारताकडून रशियाला निधी ;  अमेरिकेचा आरोप

Matthew Whitaker

ब्रुसेल्स : रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणांवर नाटोमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटेकर यांनी भारतावर जोरदार टीका केली आहे. युक्रेनविरोधातील युद्धात रशियाला भारत तेल खरेदीतून निधी देत आहे, असा आरोप केला आहे. भारतावर कठोर आर्थिक निर्बंध लादावेत अशी त्यांनी मागणी केली आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उत्तर अटलांटिक करार संघटनेतील (नाटो) अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटकर यांनी युक्रेन युद्धासाठी भारतावर हल्लाबोल केला आहे. व्हिटकर यांनी भारतावर रशियाच्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लष्करी मोहिमेला निधी देण्याचा आरोप केला. फॉक्स न्यूजशी बोलताना अमेरिकन राजदूत म्हणाले की, भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांना रशियन तेलाची विक्री केल्याने मॉस्कोच्या युक्रेनमधील लष्करी मोहिमेला निधी मिळत आहे. व्हिटकर यांनी मॉस्कोवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी या देशांवर अतिरिक्त निर्बंध आणि शुल्क आकारण्याची विनंती केली. (Matthew Whitaker)

अमेरिकन मीडिया ब्रॉडकास्टर फॉक्सवर व्हिटकर यांनी दावा केला की रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे आणि तेलाचे उत्पन्न युद्धासाठी निधीचा मुख्य स्रोत राहिला आहे. युक्रेनमध्ये मॉस्कोची आक्रमकता अस्वीकार्य आहे असा स्पष्ट संदेश देण्यासाठी कोणतेही अतिरिक्त निर्बंध आणि शुल्क युरोपियन युनियन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी समन्वयित केले पाहिजे यावर व्हिटकर यांनी भर दिला.

व्हिटेकर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, या युद्धासाठी खर्च होणारा पैसा भारत, चीन आणि ब्राझील सारख्या देशांना तेल विक्रीतून येत आहे. मला वाटते की पुढचे पाऊल म्हणजे पुतिनसाठी व्यापार खर्च वाढवणे आणि महसूल कमी करण्यासाठी अतिरिक्त निर्बंध आणि शुल्क लादणे. अमेरिकेच्या राजदूतांनी सांगितले की, रशियाच्या कृती स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत. युक्रेनमध्ये सुरू असलेला मृत्यू आणि विनाश थांबवला पाहिजे. (Matthew Whitaker)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी यापूर्वीच रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर वारंवार निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर २५ टक्के वेगळा कर लादला आहे, त्यानंतर भारतीय वस्तूंवरील कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की भारताला अन्याय्यपणे लक्ष्य केले जात आहे. युरोपियन युनियन हा रशियन गॅसचा एक महत्त्वाचा खरेदीदार आहे आणि चीन हा रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे यावर भारताने भर दिला आहे. (Matthew Whitaker)

Related posts

एसआयआर प्रक्रियेत वगळलेले दहा कोटी मतदार कोण?

भारत-चीन सीमेवर नेमका काय संघर्ष सुरू आहे?

पश्चिम घाटात गोमेच्या तीन नव्या प्रजातींचा शोध