Marco Janssen : भारत २०१ धावांत गारद ; मार्को जॅन्सनचे सहा बळी

Marco Janssen

गुवाहटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभ पंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१ धावात गारद झाला. रस्ता म्हणून वर्णन केलेल्या खेळपट्टीवर आफ्रिकेच्या मार्को जॅन्सनने सहा गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेने ३१४ धावांची आघाडी घेत भारतावर दबाव टाकला आहे. टॉप मोस्ट भारतीय खेळाडूंनी खराब फटके, बेभरवश्याची फलंदाजी केल्याचा भारताचा डाव कोसळला. (Marco Janssen)

काल भारतीय गोलंदाज कुलदीप यादवने गुहाहटीच्या खेळपट्टीची तुलना रस्त्याशी केली होती. त्याच खेळपट्टीवर ६ फूट ८ इंच उंचीच्या मार्को जॅन्सनने भारताला २०१ धावांत गुंडाळले. त्याने ४८ धावात सहा गडी बाद केले. काल त्याने फलंदाजीत चमक दाखवली होती. त्याने तळच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात आफ्रिकेने दुसऱ्या डावात दिवसअखेर नाबाद २६ धावा केल्या. २८८ धावांचे अधिक्य असतानाही आफ्रिकेने फॉलो ऑन लादू न करण्याचा निर्णय घेतला. (Marco Janssen)

दक्षिण आफ्रिकेच्या ४५८ धावांचे आव्हान स्वीकारताना मैदानात उतरलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी सावध खेळ केला. यशस्वी जयस्वालने अर्धशतक झळकावताना ५८ धावा केल्या. केएल राहूलने २२ धावा केल्या. पहिल्या गड्यासाठी ९५ धावांची भागिदारी केली. त्यानंतर भारताची अवस्था ७ बाद १२२ झाली. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने झुंज दिली. सुंदरने ९२ चेंडूत ४८ धावा तर कुलदीपने १३४ चेंडूत १९ धावा केल्या. दोघांनी जवळपास ३५ षटकांत ६२ धावांची भागिदारी केली. दोघांचा प्रतिकार चांगला होता. पण कर्णधार ऋषभ पंत आणि अन्य खेळाडूंनी बेभरवश्याची फलंदाजी केली. साई सुदर्शन (१५), जुरेल (०), पंत (७) हे तीन खेळाडू १३ चेंडूत बाद झाले. मार्को जॅन्सने सहा गडी बाद केले. सिमॉन हार्मरने तीन तर केशव महाराजने एक गडी बाद केले. (Marco Janssen)

Related posts

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार