Vyas Parva : दुर्गा भागवतांचे ‘व्यासपर्व’ हिन्दी भाषेत

Vyas Parva

कोल्हापूर : प्रतिनिधी :   दिल्ली येथील राजकमल प्रकाशनने लेखिका दुर्गा भागवत यांचे ‘व्यासपर्व’ हिन्दी भाषेत अनुवादित केले आहे.  या पुस्तकाचा अनुवाद वासंतिका पुणतांबेकर यांनी केला आहे. नव्वद वर्षीय भागवत पुण्याच्या बेहेरे ज्येष्ठ निवासात राहतात.  स्लिप डिस्कमुळे बिछान्यात पडून असतानाही त्यांचे लेखनकार्य चालू असते. (Vyas Parva)

वासंतिका पुणतांबेकर यांच्या कुटुंबियांनी हिन्दी ‘व्यासपर्व’चा प्रकाशन समारंभ ज्येष्ठ निवासातच थाटामाटात करण्यात आला . ‘मिळून साऱ्याजणी’ नावाच्या प्रसिद्ध मासिकाच्या संपादिका डॉ. गीताली वि.म. ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. कार्यक्रमात सोनाली ढापरे, विदिशा पुणतांबेकर, विशाखा ठाकूर यांचा सहभाग होता. या कार्यक्रमासाठी निवासातील सभासद व मुंबई, पुणे, दिल्ली येथून आलेली पाहुणे मंडळी उपस्थित होते. 

 वासंतिका पुणतांबेकर गेली ४५ वर्षे भाषांतराच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ‘राधेय’, ‘ऋतुचक’ यांसारख्या पुस्तकांचे हिन्दीत भाषांतर केले आहे. त्यांची भाषांतरीत तशी ३० च्या वर, तर स्वतःची मूळ स्वरूपात मराठीत लिहिलेली चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. (Vyas Parva)

गीताली वि.मं म्हणाल्या, की ‘व्यासपर्व’ हे महाभारतातील व्यक्तिरेखा आणि आजच्या युगातील व्यक्ती यांचा सुरेख संगम आहे. महाभारतातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आजही आपल्याला आपल्या अवती-भवती दिसत राहतात. कारण मानवाचीच ती भिन्न-भिन्न रूपे आहेत. वासंतिका पुणतांबेकरांनी हे पुस्तक हिन्दीत आणल्यामुळे हिन्दी भाषिकांनाही त्याचा लाभ घेता येईल. (Vyas Parva)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या