मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हाच भाजपचा अजेंडा : संजय राऊत

Marathi mayor should not be elected

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईसह कुठेही मराठी महापौर महापौर होऊ द्यायचा नाही, हाच खरा भाजपचा अजेंडा आहे, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होणार आणि उत्तर भारतीय महापौर होईल इतके नगरसेवक आम्ही निवडून आणू असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावर खासदार राऊत यांनी कृपाशंकरसिंह यांच्यासह भाजपचा खूरपूस समाचार घेतला.

भाजपला मुंबईत मराठी माणूस संपवायचा आहे

कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही. खंर तर हा भाजपचा अजेंडा आहे. वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपने कृपाशंकर सिंह यांची नेमणूक केली आहे. भाजपकडून कटकारस्थान केले जात आहे. आधी ते वातावरण निर्मिती करतात आणि चाचपणी करतात. भाजपला  मुंबईमध्ये मराठी माणूस संपवायचा. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांनी केलेले वक्तव्य अनावधानाने केलेले नसून ही भाजपची रणनीती आहे. वातावरण निर्मिती करून परप्रांतियांना जागे करायचे आणि शिवसेना, मनसे किंवा मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी त्यांनाा प्रवृत्त करायचे, असा दावा राऊत यांनी केला. (Marathi mayor should not be elected)

भाजपचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात सहभाग नव्हता

भाजपावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, भाजपचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यात कधी सहभाग नव्हता.  बेळगाव कारवारच्या सीमाप्रश्नाच्या संघर्षात त्यांचा सहभाग नव्हता.  तो पक्ष महाराष्ट्राच्या बाजुने किंवा मराठी माणसाच्या बाजुने उभा राहिल याची कल्पनाच कुणी करू नये. मराठी माणसाच्या लढ्यात भाजपचा सहभाग नव्हता. शिवसेना आणि काँग्रेसचे नेते होते. त्यावेळी चिंतामणी देशमुख यांनी राजीनामा दिला होता. तर शरद पवार हे देखील या लढ्यात होते. तसेच कम्युनिस्ट पक्ष होते, मुस्लिम समाजाचे नेते होते. शाहीर अमर शेख यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवून सोडला होता. परंतु भाजप कुठेच नव्हता. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही, यासाठी त्यांची कारस्थाने सुरू झालेली आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.मराठी माणूस ठामपणे शिवसेना आणि मनसेच्या पाठीशी उभा राहतोय. तसेच आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अशावेळी अमराठी आणि परप्रांतियांची मतं आम्हाला मिळावी, यासाठी मुंबईचा महापौर अमराठी करू, असा त्यांनी एक अजेंडा समोर आणला आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. (Marathi mayor should not be elected)

सयाजीराव गायकवाड बडोद्याचे शासक होते

संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये गुजराती समाजाविरुद्ध मराठी माणसाची लढाई कधीच नव्हती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्य आल्यापासून त्यांनी हा रंग दिला आहे. पण एकेकाळी बडोद्याचे महाराज गायकवाड संपूर्ण गुजरातचे शासक होते. ज्या गुजरातवर मराठ्यांचे साम्राज्य होते, त्या गुजरातशी भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. मोरारजी देसाई यांनी मुंबईत मराठी माणसावर आणि गुजरातमध्ये गुजराती माणसावर गोळ्या चालवल्या आहेत. हा इतिहास आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे नेहमी सांगितले आहे. त्यामुळे भाजपाने गुजराती समाजाला सांगितले आहे की, तुमची लक्ष्मी आणि आमची सरस्वती एकत्र आली तर आपण देशावर राज्य करू. पण यांना फक्त काळ्या पैशाच्या लक्ष्मीचेच राज्य आणायचे आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. (Marathi mayor should not be elected)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर