Mandliks’ criticism of Mushrif : मुश्रीफांची वृत्ती म्हणजे वापरा आणि फेकून द्या :  संजय मंडलिक

Mandliks' criticism of Mushrif

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेले दशकभर कट्टर विरोधक असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांनी कागल नगरपालिकेत युती केल्याने शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हसन मुश्रीफ यांची वृत्ती म्हणजे वापरा आणि फेकून द्या, अशी टीका मंडलिकांनी केली आहे. (Mandliks’ criticism of Mushrif)

कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ–घाटगे युतीमुळं राजकीय समीकरणे बदलली असून  माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुश्रीफ आणि घाटगे यांच्यावर टीका करत शिवसेनेच्या विजयाचा दावा केला आहे.  

कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहावेळा विजयी झालेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात तब्बल नऊवेळा स्थान मिळवणारे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  यांना वाटतं की, आपल्याला आमदार राहायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला जवळ घेऊन त्यांच्यासोबत युती करायची आणि युती झाल्यावर वापरा आणि फेकून द्या ही मुश्रीफ यांची वृत्ती आहे अशी टीका संजय मंडलिक यांनी केली. (Mandliks’ criticism of Mushrif)

मंत्री मुश्रीफांना माझ्या शुभेच्छा आहेत, याच आयुष्यात नाहीतर पुढच्या आयुष्यात देखील त्यांनी आमदार आणि मंत्री व्हावे, पण मैत्री करताना उपकाराची त्यांनी जाणिव ठेवावी असा टोलाही मंडलिकांनी लगावला. राजकारणात ज्यांनी त्यांना निर्माण केले या स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांना विसरू नये. मुश्रीफ प्रत्येक पायरी चढतात,  मात्र चढल्यानंतर ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात”, अशी टीकाही मंडलिक यांनी वर केली. मुश्रीफ घाटगे युतीमुळे कागल तालुक्यात पुन्हा एकदा मुश्रीफ, मंडलिक राजकीय वॉर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Mandliks’ criticism of Mushrif)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर