Malegav suger factory : माळेगाव साखर कारखान्यात अजित पवार गटाची बाजी

Malegav suger factory

पुणे : प्रतिनिधी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणूकीत राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निलकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. विरोधी सहकारी पॅनेलला एका जागेवर समाधान मानावे लागले. शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलचा नामुष्कीजनक पराभव झाला. (Malegav suger factory)

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांना चंद्रराव तावरे यांनी तगडे आव्हान दिले होते. निवडणूकीच्या प्रचारात मोठा धुरळा उडाला होता. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. पण कारखान्याच्या सभासदांनी अजित पवारांच्या पॅनेलला कौल दिला. दोन दिवस मतमोजणी सुरू होती. सहकारी संस्था गटातून अजित पवार विजयी झाले. विरोधी सहकार पॅनेलचे प्रमुख चंद्रकांत तावरे सांगवी गटातून विजयी झाले. (Malegav suger factory)

विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मते अशी, खांडज शिरवली गट, प्रताप आटोळे ४३२८, सतीश फाळके ८४०४, सांगवी गट, चंद्रकांत तावरे (सहकार पॅनेल) ८१६३, गणपत खलाटे ८५४३. पणदरे गट, तानाजी कोकरे ८४९५, योगेश जगताप ८६३५, स्वप्नील जगताप ७९३३, माळेगाव गट, शिवराज जाधवराव ८३८८, बाळासाहेब तावरे ७७७२, राजेंद्र बुरुंगले ७९२९. महिला गट, संगीत कोकरे ८४४०, ज्योती मुलमुले ७५७६. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग, विलास देवकाते. इतर मागासवर्ग प्रवर्ग, नितीन शेंडे, ८४९४. अनुसुचित जाती जमाती प्रवर्ग, रतनकुमार भोसले ८६७०. (Malegav suger factory)

Related posts

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य