मुंबई : यजमान इंग्लंडने भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात पाच गड्यांनी पराभव केला. भारताने पहिल्या डावात ३१ धावात सात गडी गमावले तर पाच झेल सोडल्यामुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या खेळाडूंनी पाच शतके ठोकून भारताला सामना गमावल्याचे शल्य क्रिकेटप्रेमी बोचत आहे. (India lost Match)
भारताने पहिल्या डावात ४७१ धावा जमवल्या होत्या तर दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. विजयासाठी इंग्लंडला ३७१ धावांचे आव्हान दिले होते. पण भारताचा भरवश्याचा गोलंदाज जसप्रित बुमराह, सिराज दुसऱ्या डावात एकही बळी मिळवू शकले नाहीत. तसेच दुसऱ्या डावात भारताने गचाळ क्षेत्ररक्षण केल्याने झेल सोडले. (India lost Match)
इंग्लंडच्या विजयात सलामीवर बेन डकेट हिरो ठरला. पहिल्या डावात त्याने ६२ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात १३७ धावांची अप्रतिम खेळी करत भारताकडून विजय हिसकावून घेतला. भारतीय संघाची शेवटची फळी फलंदाजीत सपशेल अपयशी ठरली. पहिल्या डावात भारताचे सात फलंदाज अवघ्या ४१ धावांत स्वस्तात तंबूत परतले. तर दुसऱ्या डावात ३१ धावात निम्मा डाव गारद झाला. भारताने चारशे धावांच्या पुढे आघाडी घेतली असती सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाला असता. (India lost Match)
जसप्रीत बुमराह वगळता भारताच्या गोलंदाजीत दम दिसून आला नाही. बुमराह त्वेषाने गोलंदाजी करत होता. पहिल्या डावात सिराजची इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. दुसऱ्या डावात त्याने चांगली गोलंदारी करत दोन गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाही महागडा गोलंदाज ठरला. दोन्ही डावात सहा पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा केल्या. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. जडेजाही फिका पडला. त्याने एकमेव गडी बाद केला. (India lost Match)
भारताचे सुमार क्षेत्ररक्षण
भारतीय संघाने सुमार क्षेत्ररक्षण केल्याने सामना गमावण्याचे प्रमुख ठरले. या सामन्यात खूप झेल सोडले. यशस्वी जैस्वालने चार झेल सोडले. पहिल्या डावा भारताने पाच झेल सोडले. दुसऱ्या डावात दोन झेल टीम इंडियाकडून सुटले. पण दुसऱ्या डावात जॅक क्रॉलीचा झेल सोपा नव्हता. जसप्रित बुमराहने फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. (India lost Match)