कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान आधिविभागातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे समन्वयक प्रा. महेश सुर्याजीराव साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतर्फे सिव्हिल इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. (Mahesh Salunkhe)
प्रा. साळुंखे हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त कर्मचारी श्री. गजाननराव उर्फ एस. पी. साळुंखे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी ‘इन- इलॅस्टिक सेस्मिक डिझाईन ऑफ रेईनफोर्सड् काँक्रिट स्ट्रक्चर्स युसिंग रॅपिड प्लॅस्टिक मेथड’ (“in – Elastic Seismic Design of Reinforced Concrete Structures Using Rapid Plastic Method) या विषयावर आपला प्रबंध सादर केला आहे. या प्रबंधाचे मार्गदर्शन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथील अप्लाइड मेकॅनिक्स विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस एन तंडे यांनी केले आहे. (Mahesh Salunkhe)
प्रा. साळुंखे यांच्या संशोधनातील निष्कर्ष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून, त्यांच्या संशोधनामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील भूकंपरोधक रचनांच्या डिझाईनविषयी नवे दृष्टीकोन उपलब्ध झाले आहेत. ते सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, एमआयडीसी, म्हाडा, पोलिस हाउसिंग इत्यादी शासकीय विभागांसाठी स्ट्रक्चरल, थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिटर, आरसीसी डिझाईन व प्रूफ चेकिंग कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. (Mahesh Salunkhe)
त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव , अधिविभागाचे संचालक तसेच डॉ. के .टी. कृष्णास्वामी व डॉ. ए. बी. कुलकर्णी यांचे प्रोत्साहन लाभले. (Mahesh Salunkhe)