Five killed in accident on Navale Bridge : नवले पुलावरील अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू

Five killed in accident on Navale Bridge

पुणे : प्रतिनिधी : पुणे बेंगळुरु महामार्गावर कात्रज येथील नवले पुलावर झालेल्या विचित्र अपघातात कारमधील पाचजण ठार प्राथमिक माहिती पुढे आली आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर एक कंटेनरवर आदळला. अपघातग्रस्त दोन कंटेनरमधील कार चेचली गेली. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातातील धडक इतकी मोठी होती की स्फोट होऊन तीन वाहने पेटून आगीचे लोट पसरले. तसेच अपघातात वीस जण जखमी झाले. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे.

नवले पूल परिसर हा अपघातग्रस्त मार्ग समजला जातो. अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरचा ब्रेकफेल झाला. या कंटेनेरने सात ते आठ वाहनांना धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर दुसऱ्या कंटेनरवर जोरात आदळला. कंटेनर आदळण्यापूर्वी दोन कंटेनरमध्ये कार आली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. तसेच एका वाहनाचा मोठा स्फोट तिन्ही वाहनांना आग लागली. कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. कार जळून खाक झाला. ब्रेक फेल झालेला ट्रक राजस्थान पासिंगचा असून साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता. या अपघातात चाळीस ते पन्नास वाहनांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या मार्गावरील काही काळ वाहतूक थांबवण्यात आली. पोलिसांनी बचावकार्य सुरू करुन जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?