Threat of falling out of government : सरकारमधून बाहेर पडण्याची अजित पवारांची धमकी?

Threat of falling out of government

मुंबई : प्रतिनिधी : जमीन गैरव्यवहारप्रकरणी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी त्वेशाने आणि रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरुन पाठिंबा देतो, अशी भूमिका माझ्या कानावर आली आहे, असा दावा शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

कोरेगाव जमीन व्यवहारासंबधी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर जमीन व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली असली तरी अजुनही जमीन व्यवहार रद्द झालेली नाही. त्यावर अंबादास दानवे यांनी दावा केला आहे. (Threat of falling out of government)

अंबादास दानवे यांनी आज एक्स वर जमीन व्यवहारासंबधी पोस्ट केली आहे.  या पोस्टमध्ये त्यांनी ‘काका मला वाचवा’ असा उल्लेख केला आहे. यासंदर्भात अंबादास दानवे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, याप्रकरणी शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा पार्थ पवार यांना कसं वाचवता येईल. कारण या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवताच येणार नाही. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाही, असे दानवे म्हणाले. (Threat of falling out of government)

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या बैठकीचा उल्लेख करत अंबदास दानवे यांनी दावा केला बैठकीमध्ये अजित पवारांनी त्वेशाने आणि रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो, अशी भूमिका घेतल्याचे माझ्या कानावर आहे. माझ्यावर कानावर जे आले आहे, तेच मी बोलत आहे. यासंदर्भात खरं खोटं बाहेर येईलच. पण अशा कारणाने पार्थ पवारांना वाचवलं जातंय, असं मला वाटत असल्याचा दावाही दानवे यांनी केला. (Threat of falling out of government)

दरम्यान, अंबादास दानवे यांना विचारण्यात आले की, तुम्ही आता जो आरोप केला आहे, तर याच कारणाने भाजपाने हे सर्व केलं आहे, असं खरंच तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर अंबादास दानवे म्हणाले की, भाजपला अजित पवार यांना अडचणीचं आणण्याचा उद्देश आहे. एकीकडे कारवाई करायची आणि नंतर सारसारव करायची, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे. अजित पवार यांची आता फाईल तयार झाली आहे. त्यामुळे उद्या जर काही अजित पवार यांनी केलं तर पार्थ पवार यांना एक मिनिटात अटक होऊ शकते. भाजपाचं हे षडयंत्र आहे, असा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला. (Threat of falling out of government)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर