भुजबळ, वळसे-पाटील, मुनगंटीवारांचा पत्ता कट, १६ मराठा-१७ओबीसी मंत्री

नागपूरः भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विभागनिहाय प्रतिनिधित्व पाहिले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धरून विदर्भाला दहा, पश्चिम महाराष्ट्राला ९,  मराठवाड्याला ६, उत्तर महाराष्ट्राला ७, कोकणाला ५, ठाणे ३ आणि मुंबई २ अशी मंत्रिपदे वाट्याला आली आहेत. मंत्रिमंडळात चार महिला असून त्यापैकी तीन भाजपच्या आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर या जुन्या चेह-यांना डच्चू देण्यात आला आहे. (Maharashtra Government)

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या ४२ झाली आहे. त्यापैकी ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळात जुन्या-नव्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांकडून करण्यात आला असून मंत्रिमंडळातील जवळपास निम्मे सदस्य पहिल्यांदाच मंत्री बनले आहेत. भाजपकडून नऊ तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी पाच नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिमंडळात समावेश नाही, मात्र त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि धर्मरावबाबा अत्राम या ज्येष्ठांनाही वगळण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे सरकारला मराठा आरक्षण आंदोलनाचा नाहक विरोध सहन करावा लागू शकतो, हे कारण असल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेकडूनही दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. (Maharashtra Government)

सर्वाधिक सोळा मंत्री मराठा समाजाचे आहेत, तर ओबीसी समाजघटकांमधील सतरा जणांना संधी मिळाली आहे. हसन मुश्रीफ हे मुस्लिम समाजाचे मंत्रीमंडळातील एकमेव प्रतिनिधी आहेत. सामाजिक समीकरणे जुळवण्याचा विशेष प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासह मराठा समाजाचे चार, ओबीसी समाजघटकांतील तीन त्यापैकी एक महिला, दोन अनुसूचित जमाती आणि एक मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. मंत्रिमंडळात चार महिलांना संधी मिळाली असून त्यापैकी पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या तिघी भाजपच्या आणि आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषद सदस्य आहेत. त्यांचे चुलतभाऊ धनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथ घेतली आहे.

महायुतीतील छोट्या पक्षांच्या प्रतिनिधींना मात्र मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाही. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, तसेच रवी राणा यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. (Maharashtra Government)

राज्याचे नवे मंत्रीमंडळ
(कॅबिनेट मंत्री )

1. चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. चंद्रकांत पाटील
5. गिरीश महाजन
6. गुलाबराव पाटील
7. गणेश नाईक
8. दादा भुसे
9. संजय राठोड
10. धनंजय मुंडे
11. मंगलप्रभात लोढा
12. उदय सामंत
13. जयकुमार रावळ
14. पंकजा मुंडे
15. अतुल सावे
16. अशोक उईके
17. शंभूराज देसाई
18. आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रसिंहराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25. संजय सावकारे
26. संजय शिरसाठ
27. प्रताप सरनाईक
28. भरत गोगावले
29.मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री

1.माधुरी मिसाळ
2.आशिष जयस्वाल
3.पंकज भोयर
4.मेघना बोर्डीकर
5.इंद्रनिल नाईक
6.योगेश कदम
………………….

पक्षनिहाय मंत्र्यांची नावे आणि जातवर्गवारी अशीः

भारतीय जनता पक्षः १९

१ चंद्रकांत पाटील (मराठा)
२ मंगलप्रभात लोढा (जैन)
३ राधाकृष्ण विखे पाटील (मराठा)
४ पंकजा मुंडे (वंजारी-ओबीसी)
५ गिरीश महाजन (गु्र्जर -ओबीसी)
६ गणेश नाईक (आगरी – ओबीसी)
७ चंद्रशेखर बावनकुळे (तेली – ओबीसी)
८ आशिष शेलार (मराठा)
९ अतुल सावे (माळी -ओबीसी)
१० संजय सावकारे ( चर्मकार -एससी)
११ अशोक उईके (आदिवासी)
१२ आकाश फुंडकर (कुणबी-ओबीसी)
१३ माधुरी मिसाळ (सीकेपी)
१४ जयकुमार गोरे (माळी -ओबीसी)
१५ मेघना बोर्डीकर (मराठा)
१६ पंकज भोयर ( कुणबी – ओबीसी)
१७ शिवेंद्रराजे भोसले (मराठा)
१८ नितेश राणे (मराठा)
१९ जयकुमार रावळ (राजपूत -ओबीसी)

शिवसेनाः ११

२० दादा भूसे (मराठा)
२१ गुलाबराव पाटील (गुर्जर – ओबीसी)
२२ संजय राठोड (बंजारा -ओबीसी)
२३ उदय सांमत (ब्राह्मण)
२४ शिवसेना शंभूराज देसाई (मराठा)
२५ प्रताप सरनाईक (कुणबी -ओबीसी)
२६ योगेश कदम (मराठा)
२७ आशिष जैस्वाल (कलाल -ओबीसी)
२८ भरत गोगावले (मराठा)
२९ प्रकाश आबिटकर (मराठा)
३० संजय शिरसाट ( बौद्ध – एससी)

राष्ट्रवादी काँग्रेसः ९

३१ हसन मुश्रीफ (मुस्लिम)
३२ आदिती तटकरे (गवळी -ओबीसी)
३३ धनंजय मुंडे (वंजारी – ओबीसी)
३४ दत्तामामा भरणे (धनगर -ओबीसी)
३५ बाबासाहेब पाटील (मराठा)
३६ नरहरी झिरवाळ (आदिवासी)
३७ मकरंद पाटील (मराठा)
३८ इंद्रनील नाईक (बंजारा- ओबीसी)
३९ माणिकराव कोकाटे (मराठा)

 

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ