Maharashtra Dinman Anniversary: ‘महाराष्ट्र दिनमान’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळा

Maharashtra Dinman Anniversary

कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र दिनमान’ वेब पोर्टल आणि यु ट्युब चॅनेलचा पहिला वर्धापनदिन सोहळा गुरुवारी (१८ सप्टेंबर) साजरा होत आहे. त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दिनमान सन्मान सोहळा होत आहे. (Maharashtra Dinman Anniversary)

कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हॉटेल सयाजी येथे मेघ-मल्हार सभागृहात सकाळी १० वाजता हा सोहळा होत आहे.

यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी. पी. साबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे, श्रमिक-कष्टकऱ्यांचे नेते डॉ. भारत पाटणकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्रसिद्ध अभिनेते, कवी आणि गीतकार किशोर कदम उर्फ सौमित्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या टेबल टेनिसपटू, अर्जुनपुरस्कार प्राप्त शैलजा साळोखे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, कला आणि जाहिरात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले ‘निर्मिती’ संस्थेचे प्रमुख अनंत खासबारदार यांना दिनमान सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. (Maharashtra Dinman Anniversary)

संस्था पुरस्कार गटात वैभव नायकवडी (पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, वाळवा) आणि गणी आजरेकर (दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी-मुस्लिम बोर्डिंग, कोल्हापूर) यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि ‘मित्रा’चे उपाध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आ. अमल महाडिक आणि आ. सत्यजित देशमुख यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Related posts

विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू करावे : वासुदेव कुलकर्णी

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?