Chitranagari Seminar :  चित्रनगरीसंदर्भात गुरुवारी कोल्हापुरात चर्चासत्र

Chitranagari Seminar

कोल्हापूरः कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता हॉटेल सयाजी येथे चर्चासत्राचे उद्घाटन होईल. (Chitranagari Seminar)

कोल्हापूर चित्रनगरीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळू शकते, या मध्यवर्ती संकल्पनेवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रनगरीः कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार असा चर्चासत्राचा विषय आहे. खासदार धनंजय महाडिक, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार सत्यजित देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. अभिनेते किशोर कदम, अभिनेते सागर तळाशीकर, ईटीव्हीच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. उदय नारकर, चित्रपट अभ्यासक डॉ. कविता गगराणी आणि दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. हॉटेल सयाजी येथे मेघ-मल्हार सभागृहात चर्चासत्र होणार असून कला क्षेत्रातील लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चित्रनगरी महामंडळाचे कार्यकारी संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे. (Chitranagari Seminar)

Related posts

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी पदभार स्वीकारला

पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले