Madnaik joins BJP: सावकार मादनाईक, माजी आमदार हिरे भाजपात

Madnaik joins BJP

मुंबई : विशेष प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार अपूर्व हिरे, इंदापूरचे प्रवीण माने यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी (२ जुलै) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. (Madnaik joins BJP)

नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आ. सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, राजेश पांडे, विजय चौधरी, ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. (Madnaik joins BJP) 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल मादनाईक यांच्यासमवेत स्वाभिमानीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे, शैलेश आडके, सतीश हेगाणा, सलीम पेंढारी, संजय पाटील, संदीप पुजारी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील (जि. कोल्हापूर) अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. (Madnaik joins BJP)

अपूर्व हिरे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. ते माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू आहेत. हिरे यांच्यासह नाशिकच्या माजी नगरसेविका शिळा भागवत, तुळशीराम भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरलीधर भामरे, संदीप पवार आदी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. इंदापूर तालुक्यातील प्रवीण दशरथ माने यांच्यासमवेत इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, हरणेश्वर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब चवरे, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेश जामदार, अमोल मुळे, अनिकेत इनामदार, बबनराव लावंड आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या प्रश्नांआडून राजकारण नको : अजित पवार
लोणीकर, माफी मागा!; विधिमंडळात गदारोळ

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला