Jaiswal‘s half-century : भारत ५ बाद २१२, जैस्वाल, गिलची अर्धशतके  

Jaiswal‘s half-century

बर्मिंगहॅम :इंग्लंडविरुध्द दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने चहापानानंतर खेळताना कर्णधार शुभमन गिलेने अर्धशतक साजरे केले. यावेळी भारताने ३ बाद १९३ धावा केल्या. कर्णधार गिल ५९ धावावर तर रवींद्र जडेजा १ धावांवर खेळत आहे.  (Jaiswal‘s half-century).

पहिल्या कसोटी संघातील पराभवानंतर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले. जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार नसून नितीशकुमार रेड्डी, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर संघात समावेश केला. साई सुदर्शन, बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. (Jaiswal‘s half-century)

प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताची यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहूल ही जोडी मैदानात उतरली. पाचव्या चेंडूला यशस्वीने चौकार ठोकत दमदार सुरुवात केली. मैदानावर त्याचा चौफेर खेळ केला. इंग्लंडने भेदक गोलंदाजीचे पदर्शन केले. एकीकडे यशस्वी जैस्वालने तीन चौकार मारत आपला इरादा दाखवला असताना राहूल सावधपणे खेळत होता. त्याने २५ चेंडूत दोन धावा केल्या होत्या. नवव्या षटकात वोक्सने त्यांना बोल्ड केले. बॅटल लागून चेंडू स्टंपवर आदळला. वोक्सने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. (Jaiswal‘s half-century)

पहिल्या कसोटीत अपयश ठरलेल्या करुन नायरने दुसऱ्या कसोटीत चांगली सुरुवात केली. जोश टंगच्या एक षटकात सलग दोन चौकार मारले. तर दुसरीकडे जैस्वालने धावफलक हलता ठेवला होता. जोश टंगच्या २२ व्या षटकात सलग तीन चौकार मारत अर्धशतक झळकावले. ६१ चेंडूत त्याने ११ चौकारांसह अर्धशतक साजरे केले. नायर, जैस्वाल जोडी जमली असे वाटत असताना नायर बाद झाला. ब्रायडन कार्सच्या उसळता चेंडूवर करुण नायर स्लिपमध्ये झेलबाद झाला. हॅरी ब्रुकने त्याचा झेल घेतला. नायरने ५० चेंडूत ३१ धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या २५ षटकात दोन गडी गमावून ९८ धावा केल्या. (Jaiswal‘s half-century)

उपहारानंतर खेळ सुरू झाल्यावर जैस्वाल आणि शुभमन गिल दोघे सावधपणे खेळत होते. यशस्वी जैस्वाल ७७ धावांवर खेळत आहे तर शुभमन गिल २०धावांवर खेळत असून ३६ षटकात भारत २ बाद १२९  धावांवर खेळत आहेत. यशस्वी जैस्वाल फॉर्ममध्ये खेण्त असताना त्याची खेळी जेमी स्मिथने खंडीत केली. कर्णधार बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर जेमी स्मिथने त्याचा झेल टिपला. यशस्वीने १०७ चेंडूत ८७ धावांची उपयुक्त खेळी केली.

जैस्वाल बाद झाल्यानंतर त्यांच्या साथीला ऋषभ पंत आला. बेन स्टोक्सने रिव्हर्स स्वींगचा मारा केला. भारताने ५० षटकात तीन बाद १७० धावा केल्या. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताने दुसऱ्या सत्रात ८४ धावा जोडल्या. शुभमने गिल ४२ धावांवर तर ऋषभ पंत १४ धावांवर खेळत होते. चहापानानंतर शुभमन गिल आणि ऋषभ पंत सावधपणे खेळत होते. शुभमनने १२७ चेंडूत ५० धावा करत अर्धशतक झळकावले.

गिल आणि पंतची जोडी जमली असे वाटत असताना इंग्लंडने भारताला चौथा धक्का दिला. ऑफ स्पिनर शोयब गिलने पंतला जाळ्यात पकडले. झॅक क्रॉलीने त्याचा झेल टिपला. ३९ चेंडूत त्याने २५ धावा केल्या. त्यानंतर मैदानात नितिश कुमार रेड्डी मैदानात आला. दोघांनी संघाचे द्विशतक फलकावर लावले.  ख्रिस ओक्सने भारताला पाचवा धक्का दिला. नितिश कुमार रेड्डीचा त्याने त्रिफळा उडवला. नितिश एक धाव करुन तंबूत परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात उतरला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर