Leopard attacks three people in Kolhapur : कोल्हापुरात बिबट्याचा पोलिसांसह तिघांवर हल्ला ; तीन तासानंतर बेबट्या जेरबंद

Leopard attacks three people in Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरात बिबट्या आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याने एका पोलिस कर्मचाऱ्यासह हॉटेलचा माळी, कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता दाखल झाले असून त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनची माहिती घेतली. Leopard attacks three people in Kolhapur)

सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने नागाळा पार्क, ताराबाई पार्कच्या सीमेवर असलेल्या हॉटेल वूडलँडच्या लॉनमध्ये बागकाम करणाऱ्या माळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हॉटेलमध्ये प्लेट साफ करणाऱ्या निखिल कांबळे या कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. या घटनेची माहिती कळताच शाहूपुरी पोलिसांसह शहरातील पोलिस हॉटेल वूडलँड परिसरात आले. त्यानंतर बिबट्याने परिसरात विवेकानंद कॉलेजच्या समोर असलेल्या एका अपार्टमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला. पोलिस बिबट्या कुठे आहे याच शोध घेत असताना बिबट्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करत त्याला जमिनीवर लोळवले. पण नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पळून गेल्यावर पोलिस कर्मचाऱ्याची सुटका झाली. पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर हल्ला केला आहे. त्यानंतर लगेच एका अरुंद बोळातून पळत सुटला. (Leopard attacks three people in Kolhapur)

या घटनेची माहिती कळताच वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला ट्रँक्विलायझर गनचा वापर करण्यात येत असून बिबट्याला पकडण्यासाठी जाळीही आणली आहे. दरम्यान बिबट्याचा शोध घेत असताना बिबट्याने एका मोकळ्या चेंबरमध्ये उडी घेतली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी टँरक्विलायझर गनचा वापर करुन बिबट्याला बेशुद्ध केले. बेशुद्ध बिबट्याला वनखात्याच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. पिंजऱ्यांतील बिबट्याला टेंपोतून वनखात्याच्या ऑफिसमध्ये नेण्यात आले. (Leopard attacks three people in Kolhapur)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर