Kamaladevi : करवीरनिवासिनी अंबाबाईची पहिल्या दिवशी कमलादेवी रुपातील पूजा

Kamaladevi

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सोवाच्या पहिल्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईची कमलादेवी रुपातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (Kamaladevi)

देव व असुरांनी जेव्हा समुद्र मंथन करण्याचे नियोजन केले. तेव्हा मंदार पर्वताची घुसळण व वासुकी नागाची दोरी करुन त्यांनी समुद्र घुसळण्यास सुरुवात केली. तेव्हा श्रीकमलालक्ष्मी ही पहिली देवतारत्न मार्गशीर्ष अमावस्येस प्रकट झाली. त्यानंतर पुढे तेरा रत्ने प्रगट झाली. कमलालक्ष्मी जेव्हा प्रगटली तेव्हा तिच्या तेजाने चराचर दीप्तमान झाली. कमलादेवीला कमला, लक्ष्मी, दशमी, गजलक्ष्मी, गजेंद्र लक्ष्मी नावाने ओळखले जाते. आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी कमलादेवी रुपातील पूजा बांधण्यात आली. (Kamaladevi)

अंबाबाईला कमलादेवीचे रुप देण्यात आले. देवीने दोन्ही हातात कमळ धारण केले असून खालील दोन्ही हात वरदायक व अभयकर आहेत. ती कमळात बसली असू हत्तींनी वेष्टिलेली आहे. ही दशमहाविद्यातील दहावी देवता आहे. हिचा सदाशिव नारायण महाविष्णू असून ती श्रीकुलातील देवी, दक्षिणाम्ययपीठस्था आहे. श्रीपूजक बाबूराव ठाणेकर, प्रसाद लाटकर व योगेश जोशी यांनी पूजा बांधली आहे. (Kamaladevi)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर