Jarange denied permission : उच्च न्यायालयाने जरांगेंना आझाद मैदानात परवानगी नाकारली

Jarange denied permission

मुंबई : प्रतिनिधी : राठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. जरांगेंच्या या आंदोलनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगेंना खडसावत त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नसल्याचे स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये येण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मनोज जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले. (Jarange denied permission)

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे आता या मागणीला पूर्ण करण्यासाठी त्यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे बुधवारी (२७ ऑगस्ट ) मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघण्याची घोषणा केली. पण त्यांनी या आंदोलनासाठी आणि मोर्चाला परवानगी घेतली नसल्याने ती परवानगी आधी घ्या, असे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने आज मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

मनोज जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. पण, उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आझाद मैदानावरती परवानगीला काय प्रॉब्लेम आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मुंबई उच्च न्यायालय शंभर टक्के परवानगी देणार, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. जनतेचे गाऱ्हाणे न्यायदेवता ऐकेल, असेही मनोज जरांगे म्हणाले. (Jarange denied permission)

 न्याय देवता आम्हालाही न्याय देईल. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे. सरकार जर अशी अडवणूक करत असतील लोकशाही बदलावी लागेल. न्याय देवता आम्हाला न्याय देईल, आमचेही वकील बांधव न्यायालयात जातील. आणि आम्ही २७ ऑगस्टला मुंबईला जाणार असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही कायदा, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु. आम्ही मुंबईत १०० टक्के जाणार. न्यायदेवतेच्या नियमांचे पालन करु, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारने मराठ्यांसोबत षडयंत्र करु नये. नवी मुंबईत, खारघर येथे आम्हाला परवानगी देता येते मग आम्हाला आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून कसे काय रोखता येईल, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. (Jarange denied permission)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर