४४ वर्षानंतर भारतीय महिला संघाने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले

India's women's hockey team wins gold after 44 years

नवी दिल्ली : प्रतिनिधी : तब्बल ४४ वर्षाचा हॉकीमधील दुष्काळ संपवत भारताने अशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या गटात सुवर्णपदक जिंकले. भारताने चीनचा १-० असा पराभव केला. लालेरेस्मियामीने विजयी गोल डागला. या विजयाने २०२८ च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला संघाने पात्रता मिळवली. (India’s women’s hockey team wins gold after 44 years)

जपानमधील नागोवा अशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाचा चीनबरोबर अंतिम सामना खेळवला गेला. पहिल्या क्वॉटरमध्ये भारताच्या लालेरिस्मियामीने चीनचा बचाव भेदत गोल केला. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला एका जोरदार रिव्हर्स हिटने तिने जोरदार गोल केला.  त्यानंतर चीन संघाने पुढील तीन क्वॉटरमध्ये भारतीय गोलक्षेत्रात चढाया केल्या. पण भारतीय संघाने भक्कम बचाव करत गोल चढू दिला नाही. भारताची सुशीला चानू, सविता, शिल्पी डबास, सलीमा टेटे यांनी भक्कम बचाव केला. भारताकडे ५४ टक्के तर चीनकडे ४६ टक्के चेंडूवर ताबा होता. भारताला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले तर चीनला एक मिळाला. भारतीय संघाने जास्तीत जास्त वेळ चेंडू आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या पाच मिनिटात चीनने आपला गोलरक्षक बाहेर बोलावून एक खेळाडू आघाडी फळीत वाढवला. पण भारताने भक्कम बचाव साधत एक गोलची आघाडी कायम टिकवत सुवर्णपदक जिंकले. (India’s women’s hockey team wins gold after 44 years)

१९८२ मध्ये भारतीय महिला संघाने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर १९९८ आणि २०१८ मध्ये भारतीय संघ विजेतेपदाच्या जवळ पोचला होता. पण दक्षिण कोरिया आणि जपानकडून भारत पराभूत झाल्याने भारताचे सुवर्णपदक हुकले होते.

बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची हॅटट्रीक

भारतीय खेळाडूंनी अशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्णपदक पटकावत हॅटट्रीक साधली. अंकुश पाघलने ८० किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या मिनसेओंग किमचा पराभव केला. अंतिम सामन्यात अंकुशने पहिल्या फेरीत ४-१ विजय संपादन केला. दुसरी फेरी ५-० अशी एकतर्फी जिंकली. तिसऱ्या फेरीतही ४-१ ने जीत मिळवत ४-० च्या निर्णयाने सुवर्णपदक निश्चित केले.

परवीन हुडाने ६५ किलो गटात बॉक्सिंगमध्ये पॅरिस ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती चायनीज तैपेईच्या चेन निएन् चिनवर ३-२ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. तसेच लवलिनाने महिलांच्या ७५ किलो गटात चीनच्या झीयी बाओचा ५-० असा विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले. २९ व्या वाढदिवसी तिने भारताला सुवर्णपदकाची भेट दिली. (India’s women’s hockey team wins gold after 44 years)

Related posts

‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ ग्रंथाचे प्रकाशन

बर्थ डे गर्ल लवलिनाचा बॉक्सिंगमध्ये सुवर्णपंच

पोलिसांकडून ‘शिवाजी कोण होत“ पुस्तकाच्या प्रकाशकाची चौकशी