guidelines for govt employee: सरकारवर टीका करू नका; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर बंधने

guidelines for govt employee

मुंबई : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये व्हॉट्सअॅप, टेलिग्रामचा मर्यादित वापर करताना पूर्वपरवानगीशिवाय स्वतःची प्रशंसा करू नये, सरकारी कागदपत्रे शेअर करू नयेत, असे म्हटले आहे. तसेच राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही चालू किंवा अलीकडील धोरणांवर टीका करू नये असे सांगितले आहे. याशिवाय आणखी काही नियम घालून दिले आहेत. त्यामुळे ही मार्गदर्शक तत्वे आहेत की सक्तीने घातलेली बंधने आहेत, असा सवाल उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (guidelines for govt employee)

सरकारी कर्मचाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये याची यादीत सरकारने केली आहे.  यामध्ये, सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक सोशल मीडिया खाती वेगळी ठेवण्यापासून, माहिती शेअर करण्यात विवेकबुद्धीपर्यंत, वैयक्तिक खात्यांवर पदनाम, गणवेश, लोगो आणि इतर माहितीचा वापर टाळण्यापर्यंतचे नियम स्पष्ट केले आहेत. (guidelines for govt employee)

स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या सर्व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना, प्रतिनियुक्तीवर आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांसाठी हे नियम लागू असतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९७९ आणि इतर संबंधित नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

  • सरकारी आदेशातील मुख्य मुद्दे :
  • राज्य सरकार किंवा भारतातील इतर कोणत्याही सरकारच्या सध्याच्या किंवा अलीकडील धोरणांवर टीका करू नका
  • सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा.
  • सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे/तिचे वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वेगळे ठेवावेत (guidelines for govt employee)
  • केंद्र/राज्य सरकारने बंदी घातलेल्या वेबसाइट, अॅप्स इत्यादी वापरू नका.
  • सरकारने अधिकृत केलेली व्यक्ती, सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने, सरकारी योजना, उपक्रम इत्यादींच्या प्रसार आणि प्रसिद्धीसाठी आणि सार्वजनिक सहभागासाठी फक्त सरकारी आणि अधिकृत माध्यमांचा वापर करू शकते.
  • व्हॉट्सअॅप, टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर कार्यालयातील कामांशी समन्वय साधण्यासाठी/संपर्क साधण्यासाठी केला जाऊ शकतो. (guidelines for govt employee)
  • अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर सरकारी/विभागाच्या योजना/उपक्रमांच्या यशासंदर्भात त्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल लिहू शकतात, परंतु यामुळे स्वतःची प्रशंसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला