Ganesh Festival Competition : गणेश मंडळांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी : सतेज पाटील

Ganesh Festival Competition

कोल्हापूर : प्रतिनिधी :  गणेश मंडळांनी विधायक पध्दतीने गणेशोत्सव साजरा करत आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. एस न्यूज विधायक गणेश उत्सव स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.

           जीटीपीएल एसपीएन डिजिटल नेटवर्क आयोजित एस न्यूज सार्वजनिक विधायक गणेश उत्सव स्पर्धा आणि बाप्पांची स्वारी घरोघरी घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये  संपन्न झाला. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले,जीटीपीएल एसपीएन डिजिटल नेटवर्कचे संचालक विनय नलावडे, व्यवस्थापक नविन मेंच, यांची प्रमुख उपस्थिती होती. (Ganesh Festival Competition)

   एस न्यूजचे संपादक कृष्णात जमदाडे, स्पर्धेचे परिक्षक भाऊसाहेब सूर्यवंशी, बाळासाहेब काळे यांनी मनोगते व्यक्त केली. कसबा बावड्यातील भैरवनाथ मित्र मंडळाचे निलेश पाटील यांनी स्पर्धेच्या सातत्यपूर्ण आणि पारदर्शी आयोजनाबद्दल जीटीपीएल एसपीएन डीजीटलला धन्यवाद दिले.जुना बुधवार पेठेतील हाय कमांडो फ्रेंडस् सर्कलचे संदीप रोटे यांनी आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आपले मंडळ गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेणार असल्याचे जाहीर केले. विवेक गवळी यांनी आभार मानले. (Ganesh Festival Competition)

                              स्पर्धेचा निकाल असा.

       सर्वसाधारण गट– प्रथम क्रमांक – छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ ,कसबा बावडा, व्दितीय क्रमांक – श्री.भैरवनाथ कला,क्रीडा,सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळ,शासकीय धान्य गोडाऊन परिसर पोवार मळा. तृतीय  क्रमांक  – श्री.लंबोदर तरुण मंडळ,राजारामपुरीतील  १३ वी गल्ली. उत्तेजनार्थ – जय विजय तरुण मंडळ,कळंबा

सजीव देखावा – प्रथम क्रमांक, श्री.गणेश पूजा मित्र मंडळ,कवडे गल्ली,कसबा बावडा. द्वितीय क्रमांक – स्वस्तिक मित्र मंडळ,कसबा बावडा,  तृतीय क्रमांक – मनोरंजन तरुण मंडळ,वाडकर गल्ली कसबा बावडा,  उत्तेजनार्थ क्रमांक- बागल चौक मंडळ,बागल चौक.

तांत्रिक देखावा – प्रथम क्रमांक – हाय कमांडो फ्रेंडस् सर्कल,जुना बुधवार पेठ,  द्वितीय क्रमांक – विजेता तरुण मंडळ,पोवार मळा, तृतीय क्रमांक – श्री.जयभवानी तालीम मंडळ,माळ गल्ली कसबा बावडा,  उत्तेजनार्थ क्रमांक- जय मराठा तरुण मंडळ,राजारामपूरी ४ थी गल्ली.

आकर्षक मूर्ती – प्रथम क्रमांक – चॅवमॅव ग्रुप,साने गुरुजी वसाहत, द्वितीय क्रमांक – नुक्कड मित्र मंडळ,तोरस्कर चौक,जुना बुधवार पेठ, तृतीय क्रमांक – न्यू अमर मित्र मंडळ, नष्टे गल्ली शनिवार पेठ, उत्तेजनार्थ क्रमांक- सुपरस्टार मित्र मंडळ,महालक्ष्मी नगर,सुभाष रोड

घरगुती गणपती आरास स्पर्धा- प्रबोधनात्मक संदेश – प्रथम क्रमांक- संदीप पाटील,द्वितीय क्रमांक  -धीरज पत्की,तृतीय क्रमांक- प्रदीप मोरे.

आकर्षक सजावट – प्रथम क्रमांक- नितीन निकम, द्वितीय क्रमांक- संदीप जाधव, तृतीय क्रमांक – पूनम चव्हाण.

वैशिष्ट्यपूर्ण रिल्स– प्रथम क्रमांक – प्रकाश जाधव, द्वितीय क्रमांक- नितीन नागरपोळ, तृतीय क्रमांक- आयुष आकुर्डे.

Related posts

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर

सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला?;  सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना  सवाल