एसआयआरअंतर्गत  राज्यातील मतदार यादीतून २ कोटी ६ लाख नावे वगळली 

Two crore names were removed from the electoral roll

जमीर काझी :  मुंबई  : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या ३१ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जुन्या मतदार यादीतील तब्बल २१.१४ टक्के म्हणजेच २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ नावे वगळण्यात आली आहेत. संबंधित गणना प्रपत्र प्राप्त न झाल्याने गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नाव नोंदणी झालेली (दुबार) तसेच इतर कारणांमुळे ही नावे त्यामध्ये  समाविष्ट केली  नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. (Two crore names were removed from the electoral roll)

पुनरिक्षणानंतर राज्यात पावनेआठ कोटी मतदार

 प्रारुप याद्या भारत निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर सर्व्हिस पोर्टल’ (https://voters.eci.gov.in/), मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या (https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/) संकेतस्थळावर तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.विशेष सखोल पुनरिक्षणापूर्वी राज्यात एकूण ९  कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. त्यापैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदार (७८.८६ टक्के) प्रारुप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

 यादीत नाव आहे किंवा नाही, याची पडताळणी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरील ‘Search Your Name in Draft E-Roll of SIR 2026’ या सुविधेद्वारे करता येणार आहे. यामध्ये ईपिक (EPIC) क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. (Two crore names were removed from the electoral roll)

२१.७४ टक्के मते वगळली

दरम्यान, जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ (२१.१४ टक्के) मतदारांचा प्रारुप यादीत समावेश होऊ शकलेला नाही. संबंधित गणना प्रपत्र प्राप्त न झाल्याने गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नाव नोंदणी झालेली (दुबार) तसेच इतर कारणांमुळे ही नावे प्रारुप यादीत समाविष्ट झालेली नाहीत.

एपिक क्रमांकाच्या आधारे नावे शोधता येणार

अशा मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) List SIR २०२६ देखील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेद्वारे मतदारांना EPIC क्रमांकाच्या आधारे आपले नाव शोधता येणार असून मतदान केंद्रनिहाय ASDD यादी डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना तसेच १ ऑक्टोबर २०२६  किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रपत्र-६ व घोषणापत्र भरता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या व्होटर सर्व्हिस पोर्टलवर ऑनलाइन किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. (Two crore names were removed from the electoral roll)

Related posts

”शिंदे-फडणवीसांनी मराठा समाजाची वाट लावली”; मनोज जरांगेंचा घणाघात 

अडीचशे गर्भपात करणारा रियायर्ड सिव्हिल सर्जनला ठोकल्या बेड्या  

किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या?; न्यायालयाचा एफडीएला सवाल