गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी (२३ मे) चार माओवादी ठार झाले. गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांनी ही कारवाई केली. घटनास्थळावरून काही शस्त्रे आणि संबंधित साहित्यही जप्त करण्यात आले. (Four Maoist killed)
अतिरिक्त पोलिस अधीक्षक, प्रशासन एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सीआरपीएफच्या १२ सी-६० तुकड्या (३०० कर्मचारी) या कारवाईत सहभागी झाल्या होत्या. गुरुवारी (२२ मे) दुपारी मुसळधार पावसात कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावर सुरू करण्यात आली. सी-६० ही महाराष्ट्र पोलिसांची एक विशेष कमांडो युनिट आहे. ती माओवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसजवळ काही माओवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या दरम्यान, सुरक्षा दलांशी माओवाद्यांची चकमक झाली. यात चौघे माओवादी टिपण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले. (Four Maoist killed)
गुरुवारी दुपारी भर पावसात ही शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री काही काळ थांबवण्यात आली. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी माओवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
जवळपास दोन तास ही धुमश्चक्री सुरू होती. मारले गेलेल्या चारही माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत.
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक स्वयंचलित ‘सेल्फ-लोडिंग राइफल’, दोन ३०३ राइफल, एक बंदूक, वॉकी-टॉकी, शिविर साहित्य आणि नक्षलवादी साहित्य सापडले आहे. (Four Maoist killed) या कारवाईच्या दोन दिवस आधी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी माओवादी नेता बसवराजू याच्यासह २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
हेही वाचा :
सहा जूनचा शिवराज्यभिषेक सोहळा बरखास्त करा
हगवणे पिता पुत्रांना अटक