Sambhaji brigade slams Bhide: भिडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय

Sambhaji brigade slams Bhide

पुणे : शिवराज्याभिषेक दिन सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करावी आणि हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असे वक्तव्य करणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय, अशी जोरदार टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. त्याचा खर्च संभाजी ब्रिगेड करायला तयार आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. (Sambhaji brigade slams Bhide)

शिंदे यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शिंदे म्हणाले, मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध आहे. ६ जून ही तारीख ‘नामशेष’ करून टाका असे म्हणण् म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिकायला विरोध केला त्यांच्याच कुळातील हे संभाजी भिडे आहेत असे म्हणायला हरकत नाही. कुत्रा चावल्यामुळे या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसत आहे. मराठा-बहुजन समाजातील मुलांची डोकी भडकवण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात. पोरांच्या डोक्यात धर्मांध, विकृत आणि जातीवादी विष पेरतात. हा माणूस महाराष्ट्रासाठी धोका आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. (Sambhaji brigade slams Bhide)

खर्च आम्ही करू
६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. या घटनेला ३५१ वर्ष पूर्ण झाली. त्या दिवसाला हा माणूस जर ‘नामशेष’ करून टाका म्हणत असेल. तर हा शंभर टक्के शिवद्रोह आहे. भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळीच मनोहर पंत भिडे यांना आवरावे आणि तत्काळ येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भिडे यांची रवानगी करावी. त्याचा खर्च संभाजी ब्रिगेड करायला तयार आहे. हे असले विकृत लोक महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणे ही धोकादायक आहे. कुत्रा चावल्यामुळे भिडे पिसाळल्यासारखे बोलत आहेत, अशी टीकाही संतोष शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा :
सहा जूनचा शिवराज्यभिषेक सोहळा बरखास्त करा

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर