Football players scrubbing a friend : माजी फुटबॉलपटूने मित्राला चाकूने भोकसले

Football players scrubbing a friend

कोल्हापूर : प्रतिनिधी : दीपावली दिवशी मद्यपान करत असताना झालेल्या भांडण्यात माजी फुटबॉल खेळाडूने मित्राला चाकूने भोकसले. मित्राने डोक्यात बिअरची बाटली मारली म्हणून चाकूने वार केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आकाश भोसले (वय ३३, रा. वेताळमाळ तालीम, शिवाजी पेठ) असे माजी फुटबॉल खेळाडूचे नाव असून तर अजिंक्य अशोक साळोखे (वय ३२, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Football players scrubbing a friend)

अक्षय साळोखे, अजिंक्य साळोखे, आकाश भोसले हे तिघे मित्र असून तिघे सरनाईक कॉलनी येथील कोको हॉटेलच्या मागे रिकाम्या जागेत दारु पित बसले होते. रात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास तिघांमध्ये वाद झाला. अजिंक्य साळोखे याने ‘तू माझ्या तोंडावर बिअरची बाटली का फेकलीस’ असे म्हणाला. आकाश साळोखे याने ‘मी बाटली फेकली नाही’ असे सांगितले. त्यानंतर आकाश मोबाईलवर रिल्स पहात असताना अजिंक्य साळोखेने बिअरची बाटली आकाशच्या डोक्यात मारली. त्यानंतर आकाशाने अजिंक्यला चाकूने भोकसले. चाकूचा वार अजिंक्यच्या बरकडीजवळ घुसला. त्यानंतर अजिंक्य साळोखेला ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी आकाश भोसलेला अटक केली आहे.  (Football players scrubbing a friend)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर