Firing on Tourist : पर्वतांवरून उतरले आणि फायरिंग सुरू केले

Firing on Tourist

अनंतनाग : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यातील पर्वतांवरून दहशतवादी खाली उतरले. त्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार सुरू केला. अचानक सुरू झालेल्या गोळीबाराने पर्यटकांचा आरडाओरडा सुरू झाला. पळापळ सुरू झाली. मुले आणि महिला भीतीने थरथरत होत्या. अनेकजण मदतीची याचना करत होते. गोळीबारात घटनास्थळीच अनेकांचा मृत्यू झाला. प्राथमिक वृत्तानुसार, मृतांची संख्या २०वर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.(Firing on Tourist)

व्हायरल व्हिडीओंनी थरकाप

दरम्यान, या भयंकर घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्यात सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी धावताना दिसत आहेत. अनेक लोक जखमी किंवा स्थिर अवस्थेत जमिनीवर पडलेले आहेत. बैसरन येथील गवताळ भागात मदतीसाठी ओरडत असल्याचे दिसत आहे. घाबरलेल्या महिला रडत आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांच्या प्रियजनांना शोधत असल्याचे दिसून येत आहे. (Firing on Tourist)

एका महिलेने जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी तातडीने मदतीची विनंती केली. ‘‘भैय्या, कृपया माझ्या पतीला वाचवा,’’ अशी विनवणी ती करत होती. तिचा आवाज हताशतेने थरथरत होता, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

माझ्या पतीच्या डोक्यात गोळी लागली

पीडितांना मदत करण्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. पहलगाम रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी १२ पर्यटकांवर उपचार सुरू असल्याची पुष्टी केली आणि सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

‘‘माझ्या पतीच्या डोक्यात गोळी लागली होती तर हल्ल्यात इतर सात जण जखमी झाले आहेत,’’ असे या हल्ल्यातून वाचलेल्या एका महिलेने फोनवरून ‘पीटीआय’ला सांगितले. (Firing on Tourist)

काश्‍मीरमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अशांततेनंतर सध्या येथे पर्यटन वाढले आहे. अशा काळात ही घटना घडली.

हल्लेखोर पाइनच्या जंगलातून आले

अधिकाऱ्यांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले, तर स्थानिक रहिवाशांनी काही जखमींना घोड्यांचा वापर करून कुरणातून बाहेर काढण्यास मदत केली.

पीटीआयच्या सुरुवातीच्या वृत्तानुसार हल्लेखोर बैसरनच्या सभोवतालच्या दाट पाइन जंगलातून बाहेर पडले. १९८० च्या दशकात येथे मोठ्या प्रमाणात हिंदी सिनेमाच्या शूटिंगला पसंती दिली जात होती.

सुरक्षादल बैसरनच्या दिशेने
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याची माहिती मिळताच लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिस दल बैसरन कुरणात दाखल झाले. सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी व्यापक मोहीम सुरू केली आहे. गुन्हेगारांना शोधण्यासाठी सर्व दिशांना कर्मचारी तैनात केले आहेत.

हेही वाचा :
दहशतवादी हल्ल्यात २० वर पर्यटक ठार
संसदच सर्वोच्च

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?