Female doctor suicide in Phaltan : महिला डॉक्टरची आत्महत्या ; पोलिस अधिकाऱ्याकडून अत्याचार  

Female doctor suicide in Phaltan

सातारा : प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टराने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचे कारण लिहिले असून राज्याचे गृहखाते हडबडून जागे झाले आहे. पोलिस निरीक्षकाने चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख सुसाईटमध्ये केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना ताबडतोब अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने गृहखात्याची लक्तरे वेशीस टांगली गेली आहेत. (Female doctor suicide in Phaltan)

महिला डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट

फलटण येथील उप जिल्हा रुग्णालयात एक तरुणी डॉक्टर म्हणून कार्यरत होती. गुरुवारी रात्री या महिला डॉक्टरने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी मृतदेह खाली उतरला. सुरवातीला हा आत्महत्या कोणत्या कारणावरुन केली याचा तपास सुरू असताना आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट पहायला मिळाली. त्यामध्ये असे नमूद केले आहे की “पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चारवेळा बलात्कार केला. तर पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर मला सतत मानसिक त्रास दिला” या धक्कादायक सुरसाईट नोनंतर पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. (Female doctor suicide in Phaltan)

वरिष्ठाकडून हलगर्जीपणाचा कुटुंबियांचा आरोप

संबधित महिला डॉक्टर गेल्या काही महिनापासून पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकली होती. वैद्यकीय तपासणीदरम्यान पोलिसांशी तिचा वाद झाल्यानंतर तिची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान संबधित महिला डॉक्टरने वरिष्ठाकड लेखी तक्रार दिली होती. तक्रार तिने असे म्हटले होते की “माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करीन” पण वरिष्ठांनी कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांना केला आहे. (Female doctor suicide in Phaltan)

गृहखाते खडबडून जागे

पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झाल्याने गृहखाते खडबडून जागे झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शंभूराज देसाईयांनी पोलिस अधीक्षक आणि उप अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पुरावे नष्ट होऊ नये याची काळजी घेतली जात आहे, शंभूराजे देसाई यांनी सांगितले.

पोस्टमार्टमच्या अहवालात बदल करण्यासाठी दबाव?

ही डॉक्टर अविवाहित असून मूळची बीडची असून  तिच्या आत्महत्येने जिल्हा हादरला आहे. राज्य महिला आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, या महिला डॉक्टरने पोस्ट मॉर्टेमच्या अहवालात बदल करावेत, यासाठी दबाव आणला जात होता, असा गंभीर आरोप मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केला आहे. तिने पोलीस उपअधीक्षकांकडे लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेतली नाही, असा आरोपही मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दोषींना तात्काळ अटक करण्याचे आदेश

या प्रकरणी पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनतर या दोघांवर आरोप करण्यात आले असून पीडित महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत लिहिले असून आणि याच कारणामुळे ती आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. (Female doctor suicide in Phaltan)

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप

बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरासमोर पोलिस आणि आंदोलकांत झटापट